Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » येत्या दशकात ३५ लाख नोकर्‍या

येत्या दशकात ३५ लाख नोकर्‍या

make-in-indiaनवी दिल्ली, [२५ ऑक्टोबर] – भांडवली क्षेत्राला प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी केंद्राने पावले उचलली असून, येणार्‍या दशकात ३५ लाख नोकर्‍यांचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. यासाठी दिर्घकालीन व स्थिर कररचनेस प्राधान्य देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेस यामुळे अधिक बळकटी प्राप्त होणार आहे.
सरकारच्या अवजड उद्योग विभागाने राष्ट्रीय भांडवली वस्तू धोरणाचा मसुदा जाहीर केला आहे. त्यामध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे. औद्योगिक उत्पादनाच्या वाढीत भंाडवली क्षेत्राचा फार मोठा वाटा आहे. एकूण उत्पादनात या क्षेत्राचा १२ टक्के वाटा आहे. २०२५ पर्यंत हा वाटा २० टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य नव्या धोरणात निर्धारित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या क्षेत्राने स्पर्धा करावी यासाठी, या वस्तूंच्या आयातीवर समान अबकारी कर लागू करावा आणि उत्पादन करणार्‍या उद्योगांना सेनव्हॅटमध्ये ५० टक्के क्रेडिट देण्यात यावे, अशी सूचनाही मसुद्यात करण्यात आली आहे.
कंपन्यांचे विलिनीकरण, कंपनी ताब्यात घेणे यासाठी सवलती देण्यात याव्या, असेही सुचविण्यात आले आहे. देशाअंतर्गत उद्योगात या क्षेत्राने सध्या १५ लाख लोकांना नोकर्‍या उपलब्ध करून दिल्या आहेत. हा आकडा येणार्‍या दशकात ५० लाखापर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. धोरणाचा हा अंतिम मसुदा असून, संबंधित घटकांची मतेही विचारात घेतली जाणार आहेत. संपूर्ण धोरण येत्या नोव्हेंबरपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, असा अंदाज आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25318

Posted by on Oct 26 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1283 of 2453 articles)


भाजपावरील तंत्रमंत्राच्या आरोपाचा पर्दाफाश तांत्रिक म्हणाला, लालू मुर्दाबाद पाटणा, [२४ ऑक्टोबर] - निवडणूक सभेत व्यासपीठ कोसळणे, पंखा हातावर पडणे, ...

×