Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » येमेनमधील ‘ऑपरेशन राहत’ आज संपणार

येमेनमधील ‘ऑपरेशन राहत’ आज संपणार

MoS External Affairs Minister V.K. Singh with Indian nationals, who were evacuated from Yemen onनवी दिल्ली, [८ एप्रिल] – युद्धग्रस्त येमेनमधून भारताने चार हजारहून अधिक नागरिकांची सुटका केली आहे. त्यासाठी राबविण्यात आलेली मोहीम ‘ ऑपरेशन राहत’ आता बंद करण्यात आली आहे. येमेनमधून काल मंगळवारी ७०० जणांना मायदेशी पाठविण्यात आले.
येमेनमध्ये ४१०० भारतीय असल्याची माहिती तेथील दुतावासाकडे होती. त्यातील बहुतांश नागरिक सुखरूप मायदेशी परतले आहेत. तसेच ‘ऑपरेशन राहत’ बंद करण्यात येणार असले तरी नागरिकांची सुटका करण्याचे काम सुरुच राहणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरूद्दीन यांनी दिली. येमेनमधून भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी वायुदल आणि नौदलाच्या जवानांनी चोख कामगिरी बजावली.
हवाई मार्गे होणारे मदतकार्य आज बुधवारपासून थांबविले जाणार आहे. ज्यांना भारतात परत यायचे आहे, त्यांनी आजच निघावे. अशी माहिती सय्यद अकबरूद्दीन यांनी काल ट्‌विटर वरून दिली होती. मात्र गरज भासल्यास समुद्री मार्गे सुटकेचे प्रयत्न सुरुच ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर पाकच्या बचावपथकाने सुटका केलेले ११ भारतीय मंगळवारी रात्री कराचीत पोहोचले असून त्यांना विशेष विमानाने दिल्लीत आणले जाणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21929

Posted by on Apr 9 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1813 of 2453 articles)


=सुस्तावलेपणामुळेच युद्धनौकांना अपघात: संरक्षण मंत्री पर्रिकर यांचे मत= मुंबई, [६ एप्रिल] - संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून देशातच विकसित करण्यात ...

×