Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » योगाने जगात आगळाच जोश निर्माण केला

योगाने जगात आगळाच जोश निर्माण केला

=बान की मून यांची प्रतिक्रिया=
ban ki moonसंयुक्त राष्ट्रसंघ, [२१ जून] – पहिल्याच आंतरराष्ट्रीय योगदिनाने संपूर्ण जगात आगळाच जोश निर्माण केला आहे. मी स्वत:देखील योगदिनासाठी प्रचंड उत्साहित आहे, अशी प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांनी व्यक्त केली.
संयुक्त राष्ट्रसंघात आयोजित योगदिनाचे नेतृत्व करण्यासाठी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचे शनिवारी रात्री न्यूयॉर्क येथे आगमन झाले. येथील मॅनहॅटन हॉटेलात त्यांचे स्वागत करताना बान की मून यांनी चक्क ‘नमस्ते, क्या हालचाल है’ असे हिंदीत विचारून केले. बान की मून यांच्यातील उत्साह पाहून सुषमा स्वराजही अवाक् झाल्या. हा पहिलाच आंतरराष्ट्रीय योगदिन असला, तरी यामुळे जगाच्या पाठीवरील विविध देशांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे मला दिसून आले आहे. जगाला ही आगळीवेगळी भेट दिल्याबद्दल मी भारताचे आभार मानतो. मी स्वत:देखील प्रचंड उत्साहित आहे, असे बान की मून म्हणाले.
संयुक्त राष्ट्रसंघाने आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर आंतरराष्ट्रीय दिनाचे आयोजन केले आहे. पण, योगावर प्रथमच आंतरराष्ट्रीय दिवस आयोजित करण्यात आला आहे. या दिवसाचा अनुभव मन प्रफुल्लित करणारा आणि आनंद देणारा आहे. जगभरात किान दोन अब्ज म्हणजेच २०० कोटी लोक योगदिन सोहळ्यात सहभागी होतील, असा विश्‍वास आहे, असेही त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23063

Posted by on Jun 22 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1614 of 2458 articles)


=अशीही मानसिकता= नवी दिल्ली, [२१ जून] - संपूर्ण जगाने आज रविवारी योगदिन उत्साहाने साजरा केला. योग केल्यानंतर आम्हाला खरोखरच ताजेतवाने ...

×