Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » योगासनामुळे बलात्कार कमी होतील

योगासनामुळे बलात्कार कमी होतील

=डॉ. मुरली मनोहर जोशींचे मत=
Murli Manohar Joshiनवी दिल्ली, [२३ फेब्रुवारी] – सर्वसामान्यांनी नियमितपणे योगाभ्यास करायलाच हवा. यामुळे पुरुष आणि महिलांमध्ये नवे विचार रूढ होतील, मानवी शरीराबाबतच्या विचारांमध्येही बदल होईल आणि त्याच्या परिणामाने बलात्काराच्या घटना कमी होण्यास मदत होईल, असे मत भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी व्यक्त केले.
योगासनावर आधारित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. ते म्हणाले की, सामान्य लोकांनी योगासने करायलाच हवी. यामुळे दररोजच्या बलात्काराच्या घटना थांबणार नसल्या, तरी त्या निश्‍चितपणे कमी होऊ शकतात, असे माझे व्यक्तिगत मत आहे.
यावेळी मुरली मनोहर जोशी यांनी महर्षी महेश योगी यांनी न्यूयॉर्कमध्ये केलेल्या प्रयोगाचा विशेष उल्लेख केला. विद्यापीठाच्या कुलगुरूंनी त्यांच्या प्रयोगाची पडताळणी केल्यानंतर असे दिसून आले की, न्यूयॉर्कमध्ये बलात्कारासारख्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे. इतकेच नव्हे, तर कैद्यांच्या वागणुकीतही मोठा बदल पाहायला मिळाला आहे, याकडे डॉ. जोशी यांनी लक्ष वेधले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20854

Posted by on Feb 24 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (2016 of 2453 articles)


=१५ टक्के वेतनवाढीचा झाला करार= नवी दिल्ली, [२३ फेब्रुवारी] - सरकारसोबत १५ टक्के वेतनवाढीचा करार झाल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी ...

×