Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंतप्रधानांचा पुढाकार

योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंतप्रधानांचा पुढाकार

=राज्यांसोबत दर महिन्यात घेणार प्रगती बैठक=
Narendra-modi 5नवी दिल्ली, [१५ मार्च] – लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेले ‘अच्छे दिन’ आणि सुशासनाचे आश्‍वासन पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले असून, केंद्र आणि राज्यांनी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू करावी, यासाठी प्रत्येक महिन्यात राज्यांसोबत प्रगती बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार्‍या या बैठकीत सर्व राज्यांचे मुख्य सचिव भाग घेतील. या बैठकीत सर्व मुद्यांवर चर्चा केल्यानंतर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपाय सुचविले जाणार आहेत. मार्च महिन्याची पहिली बैठक येत्या २५ मार्च रोजी होणार असून, त्यानंतर दर महिन्याच्या चौथ्या बुधवारी ही प्रगती बैठक आयोजित केली जाणार आहे. तक्रारींची दखल घेत योजनांच्या कार्यक्षम अंमलबजावणीशिवाय देखरेख व्यवस्थित होते किंवा नाही हे जाणून घेणे हादेखील या बैठकीचा मुख्य उद्देश आहे. स्वत: पुढाकार घेणारे प्रशासन आणि निर्धारित वेळेत योजनांची अंमलबजावणी, असा या प्रगतीचा अर्थ आहे. एका क्लिकवर कोणतीही माहिती तातडीने उपलब्ध व्हावी यासाठी या योजनेला आधुनिक तंत्रज्ञानाने अद्ययावत केले जाणार आहे.
याबाबत सरकारी सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य सचिवांसोबतच्या या बैठकीत पंतप्रधान देशाच्या सर्व भागातील समस्या आणि गरजांबाबत विचारविनिमय करून आवश्यक कारवाईचे निर्देश देतील. जोपर्यंत निर्देशांचे तंतोतंत पालन होत नाही तोपर्यंत ते लागू राहतील. लोकांच्या तक्रारी आणि उपलब्ध आकडेवारी याआधारे या बैठकीत समस्यांचे गांभीर्य समजून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. सध्या सुरू असलेल्या आणि प्रलंबित असलेल्या योजनांबाबतही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21487

Posted by on Mar 16 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1902 of 2453 articles)


नागपूर, [१५ मार्च] - ‘‘संघाचा विचार स्वीकारण्याची मानसिकता लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. ही स्वीकारार्हता संघाच्या प्रगतीचे व वृद्धीचे ...

×