Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » रस्ता सुरक्षा अभियान वर्षभर राबवणार : गडकरी

रस्ता सुरक्षा अभियान वर्षभर राबवणार : गडकरी

nitin gadkari2नवी दिल्ली, [१४ जानेवारी] – देशात दरवर्षी होणार्‍या पाच लाखांवर रस्ते अपघातात दीड लाख लोक मृत्यमुखी पडतात, याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत यापुढे रस्ता सुरक्षा अभियान आठवडाभर नाही तर वर्षभर चालवण्याची घोषणा केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली.
रस्ते अपघातावर आयोजित स्वयंसेवी संस्थांच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, रस्ते अपघात तसेच त्यात मृत्यमुखी पडणार्‍यांची संख्या कमी करण्याचे काम एकटे सरकार करू शकणार नाही. त्यासाठी स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी आणि माध्यमांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. रस्ते अपघाताच्या संदर्भात काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थांना ३ लाख रुपये अनुदान देण्याची सरकारची तयारी असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.
देशातील अपघातप्रवण स्थळांची ओळख पटवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी तसेच नागरिकांनी पुढे यावे, जेणेकरून अशा ठिकाणी अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, याकडे लक्ष वेधत गडकरी म्हणाले की, आतापर्यंत देशात ७२६ दुर्घटनाप्रवण स्थळांची ओळख पटवण्यात आली असून याठिकाणी अपघात प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी ११ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
रस्ते अपघातातील जखमींना लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला हेलिपॅडची व्यवस्था करण्याची घोषणाही गडकरी यांनी केली.
रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी वाहन परवाना देण्याच्या सध्याच्या पद्धतीत बदल करून नवीन पारदर्शी आणि कॉप्युटराईज्ड पद्धत लागू केली जाणार आहे. वाहनचालकांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यासोबत त्यांच्या फिटनेसची तपासणी करण्यासाठी देशभर ३ हजार केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.
रस्त्यांवरील प्रदूषण कमी करण्यासाठी विजेवरील तसेच बायोडिझेल, बायोगॅस आणि इथेनॉलच्या वाहनांना प्रोत्साहन देण्याची सरकारची भूमिका असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
यावेळी रस्ते अपघातावरील एका फेसबुक पेजचे लोकार्पणही करण्यात आले. रस्ता सुरक्षेवर बनवण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार विजेत्यांमध्ये नवी दिल्लीचे अक्षत नांगिया, तिरुअनंतपुरम्‌चे बबलू थॉमस, मुंबईचे चिराग आचार्य आणि गाझियाबादच्या राजा गोपालसिंह यांचा समावेश आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26524

Posted by on Jan 16 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (910 of 2453 articles)


अनेक अतिरेक्यांनाही बेड्या ठोकल्या कार्यालयांनाही केले सील पाकने सुरू केली कारवाई पठाणकोटला पाठविणार विशेष तपास पथक इस्लामाबाद, [१३ जानेवारी] ...

×