Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » राजकीय पक्षांना कर सवलत रद्द होण्याचा धोका

राजकीय पक्षांना कर सवलत रद्द होण्याचा धोका

►सरकार करणार कायद्यात दुरुस्ती,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २ फेब्रुवारी –
कोणत्याही व्यक्तीकडून केवळ दोन हजार रुपयांचीच रोख देणगी राजकीय पक्ष स्वीकारू शकतात, अशी तरतूद सरकारने अर्थसंकल्पात केल्यानंतर, आता राजकीय पक्षांना वठणीवर आणण्यासाठी सरकार आणखी एक पाऊल उचलत आहे. सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक वर्षी डिसेंबरपर्यंतच आयकर विवरण सादर करणे बंधनकारक करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार असून, या नियमाचे पालन न करणार्‍या पक्षाची आयकर सवलत रद्द करण्याची तरतूद त्यात राहणार आहे.
जी व्यक्ती अशा प्रकारच्या देणग्या देण्यासाठी बँकेतून निवडणूक रोखे खरेदी करते, त्या दात्याची ओळख गोपनीय ठेवण्यासाठी कायद्यात बदल करण्यात येणार आहे. महसूल सचिव हसमुख अधिया यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली.
कायद्याने राजकीय पक्षांना आयकरात सूट दिली आहे. असे असतानाही अनेक राजकीय पक्ष वेळेच्या आत आपले आयकर विवरण सादर करीत नाहीत. याच अनुषंगाने राजकीय निधी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात वित्त विधेयकाच्या माध्यमातून कायद्यात आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात येत आहेत. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर सर्व राजकीय पक्षांना कोणत्याही आढावा वर्षाकरिता डिसेंबरपर्यंत आपले आयकर विवरण सादर करणे अनिवार्य होणार आहे, असे अधिया यांनी सांगितले. आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असले, तरी आयकर विवरण त्यांना डिसेंबरपर्यंतच सादर करावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जे राजकीय पक्ष डिसेंबरपर्यंत आयकर विवरण सादर करणार नाहीत, त्यांची आयकर सवलत काढून घेण्यात येईल. आम्ही अशा पक्षांना नोटीस पाठवू आणि त्यानंतर त्यांना असलेली आयकर सवलत काढण्याची कारवाई पूर्ण करू. यामुळे राजकीय पक्षांना कडक शिस्त लागेल, असेही ते म्हणाले.
गेल्या दोन वर्षांपासूनचे आमचे आकलन असे आहे की, ५० टक्क्यांपेक्षा जास्त राजकीय पक्ष आयकर विवरण वेळेच्या आत सादर करीत नाहीत. तसेच, काही लहान राजकीय पक्ष असेही आहेत, जे विवरण सादर करण्यास सातत्याने टाळाटाळ करतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29403

Posted by on Feb 3 2017. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (69 of 2453 articles)


►अर्थसंकल्पातील प्रस्ताव, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २ फेब्रुवारी - जे करदाते प्रथमच आयकर विवरण भरणार आहेत, त्यांना एक वर्षपर्यंत छाननीतून सवलत ...

×