Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » राजनाथसिंहांचे ‘ऑपरेशन स्माईल’

राजनाथसिंहांचे ‘ऑपरेशन स्माईल’

=२५०० हरविलेल्या मुलांच्या चेहर्‍यावर फुलले हास्य=
RAJNATH SINGHनवी दिल्ली, [१८ मार्च] – केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या स्वयंसेवी संस्थेने राबविलेल्या ‘ऑपरेशन स्माईल’ मिशनने अवघ्या ३० दिवसांत २२७ बालकांच्या आणि दोन महिन्यांमध्ये तब्बल २५०० हरविलेल्या बालकांच्या चेहर्‍यावर स्माईल आणले आहे. या मिशनला मिळालेले यश पाहून, देशातील सर्वच राज्यांनी ही मोहीम राबवावी, यासाठी राजनाथसिंह आता पुढाकार घेणार आहेत.
एकट्या गाझियाबाद पोलिसांनी ३० दिवसांत २२७ हरविलेल्या मुलांचा यशस्वीपणे शोध घेतला. यातून प्रेरणा घेत सुमारे आठ राज्यांनी हे मिशन राबविले आणि २५०० हरविलेल्या बालकांना त्यांच्या परिवारात आणले. ही मोहीम सर्वच राज्यांनी हाती घ्यावी, अशी विनंती करणारे पत्र गृहसचिव अनिल गोस्वामी यांनी आता सर्व राज्यांना लिहिले आहे. विशेष म्हणजे, गाझियाबाद पोलिसांनी त्यांच्याजवळ असलेल्या हरविलेल्या मुलांच्या माहितीच्या आधारावर शहरातील आश्रय गृह, रेल्वे स्थानके, बस स्थानके, उड्डाणपुलाखालील मोकळी जागा आणि धार्मिक ठिकाणी शोधमोहीम राबविली. ही मोहीम यशस्वी कशी करायची, याबाबतचे विशेष प्रशिक्षणही सुमारे १०० पोलिसांना देण्यात आले होते.
हरविलेल्या बालकांचा शक्य तितक्या लवकर शोध घेण्यात यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र व राज्यांना दिले आहेत. त्यातच राजनाथसिंह यांच्या ‘ऑपरेशन स्माईल’ अभियानाला जबरदस्त यश मिळाल्याने एक आदर्श मिशन म्हणून राज्यांनी त्याचा स्वीकार करावा, असे पत्रात नमूद आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21581

Posted by on Mar 19 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1879 of 2453 articles)


=धन्यवाद... तू गरीब मुलांचा विचार केला= नवी दिल्ली, [१८ मार्च] - मध्यप्रदेशच्या देवास येथील अवघे सहा वर्षे वय असलेल्या भव्य ...

×