Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » राजनाथसिंहांनी घेतली गुप्तचर, पोलिस अधिकार्‍यांची भेट

राजनाथसिंहांनी घेतली गुप्तचर, पोलिस अधिकार्‍यांची भेट

=इसिसला रोखण्यासाठी सज्ज=
RAJNATH SINGHनवी दिल्ली, [१६ जानेवारी] – सोशल मीडिया आणि अन्य माध्यमांतून तरुणांवर होणारा इसिस या जहाल दहशतवादी संघटनेचा प्रभाव रोखण्यासाठी देशाची गुप्तचर आणि पोलिस यंत्रणा सज्ज आहे. अनेक देशांमधील तरुण इसिसच्या जाळ्यात अडकले असताना, भारतात मात्र हा प्रभाव अतिशय कमी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज शनिवारी केले.
केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि १३ राज्यांमधील तपास संस्था व पोलिस दलांतील वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत राजनाथसिंह यांनी बैठक घेतली. इसिसचा भारतातील प्रभाव रोखण्यासाठी सर्व राज्यांनी कोणती पावले उचलली, यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सोशल मीडियाचा होणारा गैरवापर, भारतातील युवकांना आकर्षित करण्यासाठी इसिसकडून सुरू असलेले प्रयत्न आणि शेजारील देशांमध्ये असलेला इसिसचा प्रभाव यासह राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्यांवरही चर्चा झाली. कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांनी इसिसकडे आकर्षित झालेल्या युवकांवर वेळीच आळा घातला, याकडे राजनाथसिंह यांचे लक्ष वेधण्यात आले, अशी माहिती गृहमंत्रालयातील प्रवक्त्याने दिली.
इसिसचे आकर्षण रोखण्यासाठी अल्पसंख्यकांकरिता जास्तीत जास्त कल्याणकारी योजना राबविणे, सोशल मीडियाबाबत असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य पालन करणे आणि माहिती तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात राज्य पोलिसांची क्षमता वाढविणे यासारखे विषयही चर्चेत होते. उत्तरप्रदेश, केरळ, जम्मू-काश्मीर, आंध्रप्रदेश, तेलंगणा, बिहार, तामिळनाडू, पश्‍चिम बंगाल, आसाम, कर्नाटक, मध्यप्रदेश, दिल्ली आणि महाराष्ट्र यासारख्या राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांमधील अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
यावेळी आपल्या भाषणात राजनाथसिंह म्हणाले की, भारतीय परंपरा, संस्कृती आणि मूल्यांमुळेच इसिसच्या प्रभावावर मात करणे शक्य झाले आहे. अन्य देशांच्या तुलनेत आपल्या देशात इसिसला मर्यादित ठेवण्यात यश आले असले, तरी शांत व गाफिल न राहता, इसिसच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवून, त्यावर आळा घालण्यासाठी आपण सतर्क राहायलाच हवे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26536

Posted by on Jan 17 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (905 of 2453 articles)


=अभूतपूर्व ग्रंथदिंडी= पिंपरी चिंचवड, [१५ जानेवारी] - महानगराचे हृदयस्थान असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून दणक्यात निघालेल्या ग्रंथदिंडीने नटलेल्या पिंपरी चिंचवडला ...

×