Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » राजनाथसिंह यांनी पाकला ठणकावले

राजनाथसिंह यांनी पाकला ठणकावले

rajnath singh3अमृतसर, [२२ मार्च] – जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर रविवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी पाकिस्तानला इशारा देताना, ‘कारगिल युद्ध विसरून आम्ही पुन्हा एकदा पाकिस्तानकडे दोस्तीचा हात पुढे केला. मात्र, जे आम्हाला हवे ते कधीच शक्य झाले नाही’, असे खडे बोल सुनावले. अमृतसर येथील वाघा बॉर्डर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सोहळ्यात ते बोलत होते.
कारगिल युद्धात भारत असो की, पाकिस्तान यात अनेकांना आपल्या प्राणांना मुकावे लागले. मात्र तरीही यात विजय भारताचाच झाला. असे म्हणत राजनाथसिंह यांनी पाकिस्तानला कारगिल युद्धाचीही आठवण करून दिली.
जिंदगी मे दोस्त बदल जाते हे, लेकिन पडोसी नही बदल सकते, हे अटलबिहारी यांचे शब्द मला आजही आठवतात, असे म्हणत राजनाथसिंह यांनी पाकिस्तानवर मिश्किल टिप्पणीही केली.
दहशतवादाचा हा कारभार कधीपर्यंत सुरू राहणार? याबाबत पाकिस्ताननेही आता विचार करायला हवा. सीमारेषेवरील सुरक्षा आम्ही एवढी चोख ठेवू की, साधा उंदीरही घुसखोरी करू शकणार नाही, असे म्हणत गृहमंत्र्यांनी पाकिस्तानवर चौफेर हल्ला चढविला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21664

Posted by on Mar 23 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1861 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२१ मार्च] - आज हिंदू नववर्षातील पहिला दिवस. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. राज्यात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा ...

×