Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » राजनाथसिंह सीमावर्ती भागाच्या दौर्‍यावर

राजनाथसिंह सीमावर्ती भागाच्या दौर्‍यावर

=पाक, चीन सीमेवरील स्थितीचा घेणार आढावा=
rajnath singh3नवी दिल्ली, [२० सप्टेंबर] – केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह उद्या सोमवारपासून तीन दिवस सीमावर्ती भागांचा दौरा करणार आहेत. पाकिस्तान आणि चीनच्या सीमांना लागून असलेल्या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या भागांमधील सद्य:स्थितीचा ते आढावा घेणार आहेत. याशिवाय, भारत व चीनच्या सैनिकांमध्ये गेल्या वर्षी लडाखमधील ज्या चुमार भागात तणाव निर्माण झाला होता, तिथेही राजनाथसिंह जाणार आहेत.
याच महिन्याच्या सुरुवातीला राजनाथसिंह या भागांचा दौरा करणार होते. पण, बिहार विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बोलावण्यात आलेल्या भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीमुळे त्यांनी हा दौरा पुढे ढकलला होता. भाजपा संसदीय मंडळाचे सदस्य आणि देशाचे गृहमंत्री या नात्याने त्यांना या बैठकीत उपस्थित राहणे आवश्यक होते. अखेर आज रविवारी या दौर्‍यावर केंद्रीय गृहमंत्रालयाने अंतिम शिक्कामोर्तब केले आहे.
जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागातील भेटीत राजनाथसिंह सांबा येथे इंडो-तिबेटियन सीमा पोलिसांच्या नव्या ऑफिसर मेसचे उद्‌घाटन करणार आहेत. यानंतर, पाकच्या सैनिकांकडून नियंत्रण रेषेवरील ज्या भागात सातत्याने गोळीबार सुरू असतो, त्या भागातील स्थितीचीही ते पाहणी करण्यासोबतच पाकच्या नापाक कारवायांना जवानांनी अतिशय आक्रमकपणे उत्तर देण्याचे निर्देेशही ते देणार आहेत. संपूर्ण एक दिवस या भागात घालविल्यानंतर राजनाथसिंह पूर्व लडाखच्या चुमार भागातील सीमावर्ती क्षेत्रांनाही भेट देणार आहेत, अशी माहिती गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात याच भागात तापमान उण्याखाली असतानाही दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर उभे ठाकल्याने तणाव निर्माण झाला होता. भारत आणि चीनला जोडणार्‍या सीमेवरील विद्यमान स्थितीचा आढावा घेतल्यानंतर राजनाथसिंह इंडो-तिबेट सीमा पोलिस दलाचे अधिकारी व जवानांना संबोधित करणार आहेत. यानंतर ते स्थानिक प्रशासनाच्या बैठकीतही सहभागी होतील.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23954

Posted by on Sep 21 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1438 of 2453 articles)


=१९६४ पर्यंत जिवंत असल्याचा मिळाला पुरावा= नवी दिल्ली, [१९ सप्टेंबर] - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आजवर न उलगडलेल्या मृत्यूचे रहस्य ...

×