Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » राजनाथ, पर्रीकरांनी घेतला सुरक्षेचा आढावा

राजनाथ, पर्रीकरांनी घेतला सुरक्षेचा आढावा

Rajnath Singh, Manohar Parrikarनवी दिल्ली, [५ मे] – केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह व संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जम्मू-काश्मीरसह देशातील सध्याच्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यात आला.
देशातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आणि जम्मू-काश्मिरातील पाक सीमेलगतच्या सुरक्षेबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. काश्मीर खोर्‍यात लष्कराच्या जवानाने अल्पवयीन मुलीची कथित छेडखानी केल्याच्या घटनेनंतर त्याविरोधात झालेल्या निदर्शनांच्या वेळी सुरक्षा दलांच्या कारवाईत चौघांचा मृत्यू झाल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग, इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक दिनेश्‍वर शर्मा यांनी या बैठकीत आपापल्या विभागाशी संबंधित सूचना व संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ करण्यासंबंधी केलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली, अशी माहिती अधिकृत सूत्राने दिली. गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला गृहसचिव राजीव मेहर्षी व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28185

Posted by on May 6 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (373 of 2453 articles)


कोलकाता, [५ मे] - पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज गुरूवारी सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. पूर्व मिदनापुर आणि ...

×