Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » राजन यांनी दिले व्याजदर कपातीचे संकेत

राजन यांनी दिले व्याजदर कपातीचे संकेत

Raghuram-Rajan1वॉशिंग्टन, [२९ ऑगस्ट] – चीनमधील आर्थिक संकट आणि चलनफुगवट्याचा दर लक्षात घेता रिझर्व्ह बँक अजूनही समायोजनाच्या टप्प्यात आहे आणि चलनफुगवटा व अर्थव्यवस्थेशी संबंधित आकडेवारीचा विचार केल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे सांगून आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी पतधोरणाचा आढावा घेताना व्याजदर कपातीचे संकेत दिले.
आमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेत जो चलनफुगवटा आहे तो इतर अर्थव्यवस्थांमध्ये नाही. आम्ही यावर्षी तीन वेळा व्याजदरात कपात केली आहे आणि अजूनही आम्ही ताळमेळ बसविण्याच्या टप्प्यात आहोत. येणार्‍या आकडेवारीवर आमची नजर असेल आणि त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ, असे राजन यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले. दर निश्‍चित करण्यासाठी पतधोरण समिती स्थापन करण्याच्या मुद्यावर आरबीआय आणि सरकारमध्ये एकमत झाले आहे आणि लवकरच याची घोषणा केली जाईल, असे कांसास सिटी फेडरल रिझर्व्हच्या जॅक्सन हॉलमध्ये आयोजित आर्थिक परिसंवादात भाग घेण्यासाठी आलेल्या राजन यांनी सांगितले.
राजन यांनी जे बहुचर्चित दस्तावेज सादर केले होते ज्यामध्ये २००७-०८ साली जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीचे भाकीत करण्यात आले होते, ही तीच समिती आहे. तेव्हा राजन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ज्ञ होते. व्याजदरात कपात करण्याबाबत सरकार आणि उद्योगजगताकडून राजन यांच्यावर सातत्याने दडपण येत आहे, हे याठिकाणी उल्लेखनीय.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23689

Posted by on Aug 30 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1507 of 2453 articles)


=समारोपापर्यंत ३.५२ लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन= श्रीनगर, [२९ ऑगस्ट] - गेल्या ५९ दिवसांपासून सुरू असलेल्या वार्षिक अमरनाथ यात्रेचा आज ...

×