Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » राजीव गांधी जीवनदायी योजनेची व्याप्ती वाढवणार : राम शिंदे

राजीव गांधी जीवनदायी योजनेची व्याप्ती वाढवणार : राम शिंदे

ram shindeमुंबई, [२३ मार्च] – राजीव गांधी जीवनदायी योजनेला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन या योजनेची व्याप्ती वाढविण्याकरिता ती नव्याने आखण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राम शिंदे यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत काही रुग्णालयांनी रुग्णांकडून अतिरिक्त पैसे घेतल्याबाबतचा प्रश्‍न धनजंय गाडगीळ, डॉ. पतंगराव कदम, डॉ. सुजित मिणचेकर, डॉ. सुरेश खाडे, अमिन पटेल यांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना शिंदे म्हणाले की, राजीव गांधी जीवनदायी योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून या योजनेअंतर्गत एकूण ९७१ आजारांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या ही योजना २० नोव्हेंबर २०१६ पर्यंत असून या योजनेची नव्याने आखणी करण्यात येत आहे. नव्याने आखणी करत असताना या योजनेमधील पूर्वीचे १२२ आजार कमी करुन नवीन १८५ आजार समाविष्ट करण्यात येणार आहेत. तसेच नव्याने आखण्यात येणार्‍या योजनेची सर्व माहिती लवकरच पटलावर ठेवण्यात येईल. या योजनेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी, तसेच हॉस्पिटलवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येईल. सध्या या योजनेत एकूण ४९१ हॉस्पिटल्सचा समाविष्ट करण्यात आला असून नव्याने आखण्यात येणार्‍या योजनेमध्ये सर्व हॉस्पिटलचा विचार करण्यात येईल, असेही आरोग्य राज्यमंत्र्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27558

Posted by on Mar 24 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (578 of 2451 articles)


तीन बॉम्बस्फोटांत २१ ठार; ३५ जखमी •विमानतळ, मेट्रो आणि अमिरातच्या कार्यालयाला केले लक्ष्य बु्रसेल्स, [२२ मार्च] - बेल्जियमची राजधानी ...

×