Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » राज्यपाल राम नाईक यांच्यावर सपाची टीका

राज्यपाल राम नाईक यांच्यावर सपाची टीका

Ram-Naik-Ramgopal-Yadavलखनौ, [२६ ऑक्टोबर] – रा. स्व. संघाचे स्ययंसेवक असल्यासारखे राज्यपाल राम नाईक वागत असल्याची टीका समाजवादी पक्षाचे महासचिव राम गोपाल यादव यांनी केली आहे.
पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्या येथील निवासस्थानी आयोजित बैठक संपल्यावर पत्रकारांशी बोलताना यादव यांनी राज्यपालांवर ही टीका केली.
राज्याचे गृहमंत्री असल्याचे समजून राज्यपाल राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत एकसारखे बोलत असतात, असे सांगत यादव म्हणाले की, अन्य राज्यांचे राज्यपाल घटनेच्या मर्यादेत राहून काम करीत आहेत. मात्र उत्तर प्रदेशात राम नाईक यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असल्याचे दिसत आहे. विनाकारण असे बोलण्याची पाळी त्यांनी आमच्यावर आणली असल्याचेही यादव यांनी स्पष्ट केले.
अन्य घटनांवर राज्यपाल तातडीने प्रतिक्रिया देतात पण दादरी प्रकरणी त्यांनी चुप्पी साधली असल्याने घटनेविरोधात राम नाईक राज्यात काम करीत असल्याचा आरोपही यादव यांनी यावेळी केला.
राज्यपाल हे राज्याचे संवैधानिक प्रमुख असतात. त्यांची मुख्यमंत्र्यांशी गोपनीय चर्चा होते. पण राम नाईक या भेटीलाही उघड करतात, याकडेही त्यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले.
राम नाईक हे रा. स्व. संघाचे स्ययंसेवक असल्याप्रमाणे वागत असून समाज तसेच राज्यात विष कालवणार्‍यांसोबत फिरत असतात. अशा संघटनांबरोबरही ते राहात असल्याने नाईलाजाने आम्हाला राज्यपालांविरोधात बोलावे लागत असल्याचे यादव म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25342

Posted by on Oct 27 2015. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (1273 of 2452 articles)


=युद्धाची जबाबदारी मात्र सध्याच नाही= नवी दिल्ली, [२६ ऑक्टोबर] - नौदलात महिलांना महत्त्वाची भूमिका पार पाडता यावी, तसेच महिलांची संख्या ...

×