Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » राज्याचा अर्थसंकल्प आज

राज्याचा अर्थसंकल्प आज

maharashtra-vidhansabha mumbaiमुंबई, [१७ मार्च] – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार २०१६-१७ या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प उद्या शुक्रवारी विधानसभेत सादर करणार असून, या अर्थसंकल्पातून काही दिलासा मिळतो का, याकडेच राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील. राज्यावर असलेला कर्जाचा डोंगर, दुष्काळी परिस्थिती आणि औद्योगिक विकास दर, याच्या पार्श्‍वभूमीवर सादर केला जाणार्‍या या अर्थसंकल्पाकडे राज्याच्या नजरा लागल्या आहेत.
वाढती महसुली तूट आणि वाढता कर्जाचा बोजा यामुळे राज्याची आर्थिक स्थिती चिंताजनक होती. मात्र, मागील काळात सरकारने लावलेल्या आर्थिक शिस्तीनंतरही कर्जवाढ झाली असली तरी, तुलनेने ती कमी आहे. मागील एका वर्षात राज्याच्या तिजोरीची चावी हाती घेऊन सकल उत्पन्न, महसुली तूट, महसुली जमा-खर्च याचे योग्य नियोजन करून, निधीचे विनियोजन करणारे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी आपल्या पोतडीतून राज्यातील गोरगरीब, सर्वसामान्य, नोकरदार आणि व्यापारी यांच्यासाठी काय आणतात याकडेही लक्ष लागले आहे.
दुष्काळाचे आव्हान उभे ठाकल्याने राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त ताण पडत आहे. असे असताना राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार उत्पन्नात भरीव वाढ झालेली दिसत आहे. तरीदेखील कर्जाचा बोजा कमी करण्याच्या दृष्टीने महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य सरकारला वेगळे मार्ग शोधण्याची गरज आहे. अनावश्यक खर्चाला कात्री लावण्याची गरज असली तरी, भांडवली खर्च कमी केल्यास विकास दरावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे खर्चाचे योग्य नियोजन आणि जमा-खर्चाचा मेळ नियंत्रित ठेवण्यासाठी मुनगंटीवार काय नवी क्लृप्ती लढवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27405

Posted by on Mar 18 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (628 of 2451 articles)


नवी दिल्ली, [१७ मार्च] - भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या द्विदिवसीय बैठकीला राजधानी दिल्लीत शनिवार १९ मार्चपासून प्रारंभ होत आहे. ...

×