Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर

maharashtra-vidhansabha mumbaiमुंबई, [१७ मार्च] – सोमवारी विधिमंडळात घडलेल्या ऐतिहासिक घडामोडीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला आहे. भाजपाच्या मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्याचा कारभार सोपवण्यात आला आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना खार जमीन विभागाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली असून गृह राज्यमंत्री असलेले राम शिंदे यांना कृषी खात्याचे राज्यमंत्री म्हणून अतिरिक्त भार दिला आहे. समाज कल्याण राज्यमंत्री असलेले दिलीप कांबळे यांच्याकडे भूकंप पुनर्वसन, उत्पादन शुल्क याचा अतिरिक्त कारभार असेल. याशिवाय विजय देशमुख परिवहन राज्यमंत्री यासह आता पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री कारभार पाहतील. तर गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे कौशल्य विकास, बंदरे, माजी सैनिक कल्याण हे विभाग असतील.
कॅबिनेट मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे सगळ्यात जास्त खाती होती. आता अतिरिक्त कारभार सोपवल्यामुळे खडसेंवरील भार काहीसा कमी होण्यास मदत झाली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21543

Posted by on Mar 18 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1885 of 2451 articles)


चेन्नई, [१७ मार्च] - ‘मरावे परी नेत्ररूपी उरावे’ या उक्तीनुसार मृत्यूनंतर आपल्या डोळ्यांनी दुसर्‍यांना हे जग बघता यावे, या इच्छेने ...

×