Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » राज्यात अडीच लाख शेतकरी भाजपाचे सदस्य

राज्यात अडीच लाख शेतकरी भाजपाचे सदस्य

=किसान मोर्चाचे यश=
bjp logo1मुंबई, [१९ मार्च] – भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश किसान मोर्चातर्फे राज्यभर भाजपाचे सदस्य नोंदणी अभियान चालू असून, मोर्चाच्या सदस्यांनी राज्यात अडीच लाख शेतकर्‍यांना पक्षाचे सदस्य करून घेतले आहे. दहा लाख शेतकर्‍यांना पक्षाशी जोडून घेण्यासाठी मोर्चाचे सदस्य प्रयत्न करीत आहेत.
प्रदेश किसान मोर्चाची बैठक बुधवारी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झाली. त्यावेळी सदस्यता अभियानातील किसान मोर्चाच्या कामगिरीची माहिती देण्यात आली. बैठकीस प्रदेश सरचिटणीस (संघटन) रवींद्र भुसारी, मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानोबा मुंढे, आमदार सुनील देशमुख, मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष वासुदेव काळे, मकरंद कोरडे व प्रदेश सचिव आनंदराव राऊत उपस्थित होते.
सदस्यता अभियानामध्ये विशेष कामगिरी करणार्‍या मोर्चाच्या पदाधिकार्‍यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यात मोर्चाचे बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख (२१,००० सदस्य), सातार्‍याचे जिल्हाध्यक्ष विश्‍वास सावंत (२१,००० सदस्य), कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अन्वर जमादार (११,०००), पंडितराव पाटील (७,५०० सदस्य) आणि परभणीचे जिल्हाध्यक्ष खंडेराव किसनराव आघाव (५,००० सदस्य) यांचा समावेश होता.
सहकारी क्षेत्रातील बँकांची ३१ मार्चपर्यंत पीककर्जाची मुदत वाढवून ३१ ऑगस्ट करण्यात यावी. अवकाळी पावसाच्या थैमानामुळे शेतकर्‍यांना कर्जाची परतफेड करणे अवघड झाले आहे. त्यांनी ३१ मार्चपर्यंत कर्ज परतफेड केली नाही तर राज्य सरकार व केंद्र सरकारकडून प्रत्येकी ३ टक्के व्याजसवलत मिळणार नाही. त्यामुळे मुदतवाढ मिळावी, अशी सूचना बैठकीत करण्यात आली. या बैठकीला राज्यभरातील किसान मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21610

Posted by on Mar 20 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1868 of 2451 articles)


=कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह अपक्ष आमदार मैदानात= मुंबई, [१९ मार्च] - अविश्‍वास ठराव मंजूर झाल्यानंतर विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या सभापतिपदासाठी शुक्रवार, ...

×