Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » राज्यात पीक-पाण्याच्या परिस्थितीत सुधारणा

राज्यात पीक-पाण्याच्या परिस्थितीत सुधारणा

=चांगल्या पावसाने साठ्यात वाढ, पाणी टंचाईचे सावट दूर=
good corp Karjat_Maharashtraमुंबई, [२२ सप्टेंबर] – गेल्या काही दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस पडला असून त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. तसेच धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. राज्यात आजपर्यंत ६७७ मि.मी. पाऊस झाला असून तो १०७७ मि.मी. या सरासरीच्या ६२.८ टक्के आहे. राज्यातील सर्व जलप्रकल्पांत ५४ टक्के एवढा साठा आहे.
राज्यात सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसानुसार जिल्ह्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे- नागपूर जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर धुळे, नंदुरबार, पुणे, सांगली, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या १३ जिल्ह्यात ७६ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, जळगाव, अहमदनगर, सातारा, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ५१ ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली असून नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, परभणी या चार जिल्ह्यात २६ ते ५० टक्के पाऊस पडला आहे.
राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी फक्त एका तालुक्यात सरासरीच्या तुलनेत ० ते २५ टक्के, ४६ तालुक्यांत २६ ते ५० टक्के, १७२ तालुक्यात ५१ ते ७५ टक्के, १०७ तालुक्यात ७६ ते १०० टक्के आणि २९ तालुक्यात तर १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
धरणात ५४ टक्के पाणी साठा
राज्यातील सर्व जलप्रकल्पांत ५४ टक्के साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास ७९ टक्के साठा होता. प्रकल्पातील विभागनिहाय आजचा आणि कंसात गतवर्षी याच दिवशीचा साठा पुढीलप्रमाणे-
मराठवाडा – १३ टक्के (४४), कोकण – ८८ टक्के (९३), नागपूर – ७९ टक्के (७२), अमरावती- ६७ टक्के (७६), नाशिक – ५२ टक्के (७८) आणि पुणे – ५४ टक्के (९१), इतर धरणे – ७ टक्के (९७) असा पाणीसाठा आहे.
राज्यात टँकर्सच्या संख्येत घट
राज्यातील ९०८ गावे आणि १८४२ वाड्यांना आजमितीस ११७० टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे टँकर्सची संख्या जवळपास ८०० ने घटली आहे. मागील वर्षी याच सुमारास ३६ टँकर्सद्वारे पुरवठा करण्यात येत होता.
रोहयोच्या कामावरील मजुरांच्या संख्येत वाढ
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात १२ सप्टेंबरपर्यंत १५ हजार ५२५ कामे सुरू असून या कामांवर एक लाख १६ हजार ८७६ मजुरांची उपस्थिती आहे. राज्यात ४ लाख ३३ हजार ८६० कामे शेल्फवर असून त्या कामांची मजूर क्षमता १३०३ लाख ३५ हजार एवढी आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24011

Posted by on Sep 23 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1421 of 2451 articles)


=हायकोर्टाचाही दणका, आता सुप्रीम कोर्टात जाणार= नवी दिल्ली, [२२ सप्टेंबर] - सत्र न्यायालयापाठोपाठच आज मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयानेही पत्नीचा शारीरिक ...

×