Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » राज्यात सीईटीच; केंद्राच्या अध्यादेशाने विद्यार्थ्यांना दिलासा

राज्यात सीईटीच; केंद्राच्या अध्यादेशाने विद्यार्थ्यांना दिलासा

=पंतप्रधानांचे तावडेंनी मानले आभार=
modi-tavadeमुंबई, [२० मे] – यंदाच्या वर्षी ‘नीट’ रद्द करावी या महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या आग्रही भूमिकेला आज केंद्रीय मंत्रिमडळाने पाठिंबा देत ‘नीट’ रद्द करण्याच्या अध्यादेशाला मान्यता दिली. यामुळे लाखो विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला असून, या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सार्वजनिक आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अरुण जेटली, वेंकय्या नायडू, स्मृती इराणी यांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज आभार मानले.
आजच्या निर्णयामुळे ‘नीट’च्या जाचातून लाखो विद्यार्थी आणि पालकांना मुक्तता मिळाल्याचा आनंद झाला असल्याचे तावडे म्हणाले. या निर्णयाचा फायदा ग्रामीण भागातील गरीब होतकरु विद्यार्थ्यांना होणार आहे.
पुढील वर्षी होणारी ‘नीट’ परीक्षा ही एमबीबीएस आणि बीडीएसच्या विद्यार्थ्यांसाठी मर्यादित असून होमिओपॅथी, आयुर्वेदिक, युनानी आदि अभ्यासक्रमाचे प्रवेश राज्य सीईटी मार्फत होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. ‘नीट’ संदर्भात महाराष्ट्र सरकारचा शिक्षण मंत्री म्हणून आपण दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात व्यक्तिश: उपस्थित राहिलो. राज्याचा शिक्षण मंत्री म्हणून आपले कर्तव्य पार पाडत असताना सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या वेळी ज्येष्ठ विधिज्ञांना राज्य सरकारची बाजू समजावून सांगितले तसेच या वेळी उपस्थित अन्य राज्यांच्या वकिलांशीही सविस्तर चर्चा केली असे सांगतानाच हे श्रेय कोणाचे एकट्याचे नव्हे तर सर्वांचे आहे. कोणाच्या आरवण्याने पहाट झाली तर त्या पहाट होण्यानेही आपल्याला आनंद आहे, आपण फक्त कोणा एका विद्यार्थ्याचे पालक नसून राज्यातील साडे चार लाख विद्यार्थ्यांचे पालक आहोत, असेही तावडे यांनी सांगितले.
ज्या खाजगी आणि अभिमत विद्यापीठाचे प्रवेश यंदा ‘नीट’च्या मार्फत होणार आहेत त्या विद्यार्थ्यासांठीही ऑनलाईन कोचिंग आणि वेबसाईटच्या माध्यामातून कोचिंग देण्याची सरकारची योजना सुरू राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28367

Posted by on May 21 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (306 of 2451 articles)


नवी दिल्ली, [२० मे] - २०२० पर्यंत मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग तयार करण्याची रेल्वेची योजना आहे. असे रेल्वेमार्ग तयार झाल्यानंतर प्रवासी ...

×