|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:05 | सूर्यास्त : 18:43
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.99° C

कमाल तापमान : 28.13° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 89 %

वायू वेग : 4.21 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.99° C

Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.99°C - 30.41°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 26 Apr

28.06°C - 30.34°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.2°C - 30.83°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.76°C - 32.25°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.15°C - 32.06°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.08°C - 31.82°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » राज्य पोलिस दलात १२ हजार पदे रिक्त

राज्य पोलिस दलात १२ हजार पदे रिक्त

Maharashtra Policeमुंबई , [१५ मार्च] – राज्य पोलिस दलात १२,११५ पदे रिक्त असल्याची माहिती, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विचारलेल्य प्रश्‍नाला मिळालेल्या उत्तरातून समोर आली आहे.
अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकार कायद्याखाली महाराष्ट्र राज्य पोलिस मुख्यालयाला याबाबत विचारणा केली होती आणि राज्य पोलिस दलात एकूण किती जागा आहेत, त्यापैकी किती जागा भरण्यात आल्या व किती जागा रिक्त आहेत, अशी विचारणा केली होती. गलगली यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना, राज्यात एकूण २,१९,९८६ पदे आहेत. यापैकी २,०७, ८७१ पदे भरण्यात आली असून १२,११५ जागा रिक्त असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी पी. के. घुसे यांनी दिली. उपनिरीक्षकाची सर्वात जास्त म्हणजे २,७०८ पदे रिक्त आहेत. पोलिस दलात उपनिरीक्षकाची ९,६५९ पदे आहेत. यापैकी ६,९५१ पदे भरण्यात आली असून २,७०८ पदे रिक्त आहेत. अतिरिक्त पोलिस महासंचालकाच्या एकूण २५ पैकी ३ जागा रिक्त आहेत, तर विशेष महानिरीक्षकाच्या ४७ पैकी ८ जागा रिक्त आहेत. याव्यतिरिक्त उप-महानिरीक्षक, पोलिस निरीक्षक व दलातील इतर काही पदेदेखील रिक्त आहेत.
गलगली यांनी पोलिस दलात हिंदू , शीख, ख्रिश्‍चन आणि मुस्लिम अधिकारी किती आहेत, असा प्रश्‍न उपस्थित केला होता. यावर पोलिस दलात धर्माच्या आधारे नियुक्ती करण्यात येत नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, जातीच्या आधारे नियुक्ती करण्यात येते, असे स्पष्ट करण्यात आले.

Posted by : | on : 16 Mar 2015
Filed under : ठळक बातम्या, महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g