Home » उ.महाराष्ट्र, ठळक बातम्या » राज यांच्या दौर्‍यावर बहिष्कार

राज यांच्या दौर्‍यावर बहिष्कार

=भाजपाही मनसेला भिडला=
नाशिक, (१० जानेवारी) – भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींवर बोचरी टिका करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरेंनी भाजपा कार्यकर्त्यांना आणि पदाधिकार्‍यांना दुखावले आहे. परिणामी, नाशिक महापालिकेत असलेली मैत्री विसरून भाजपाने सध्या नाशिक दौर्‍यावर असलेल्या राज ठाकरेंच्या सर्व कार्यक्रमावर त्यांनी बहिष्कार घातला आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील मनसे-भाजपाच्या युतीविषयीच प्रश्‍नचिन्ह उभे ठाकले आहे.
नाशिक मनपात युतीची सत्ता असल्याने दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या दौर्‍याच्या वेळी महत्त्वाचे स्थानिक नेते आवर्जून उपस्थित राहतात. मात्र, ‘नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळताच त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्रिपद सोडायला हवे होते. त्यांनी गुजरातच्या परिघातून बाहेर पडावे आणि संपूर्ण देशाचा विचार करावा,’ असा फुकट सल्ला देऊन राज यांनी नवाच वाद निर्माण केला होता. ‘राज यांनी मोदींना सल्ला देण्याची गरज नाही. ते स्वत:चे निर्णय घ्यायला सक्षम आहेत,’ असे प्रत्युत्तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. वरिष्ठ नेत्यांच्या या कठोर भूमिकेमुळे नाशिक भाजपानेही बहिष्कारास्त्र उगारले असून ‘मोदींना अनावश्यक सल्ले देण्यापेक्षा नाशिकच्या विकासकामांवर लक्ष केंद्रीत करा,’ असे खडे बोल सुनावले आहेत.
आपल्या चार दिवसीय दौर्‍यात राज ठाकरे कोट्यवधी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे भूमिपूजन करणार आहेत. या सर्व कार्यक्रमांकडे भाजपा सदस्यांनी पाठ फिरविली आहे, हे विशेष.

Short URL: https://vrittabharati.in/?p=10036

Posted by on Jan 11 2014. Filed under उ.महाराष्ट्र, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.महाराष्ट्र, ठळक बातम्या (2450 of 2451 articles)


=बँका घेणार शुल्काच्या नक्की आकड्याचा निर्णय= नवी दिल्ली, (३ जानेवारी) - बँकेत जाऊन, रांगेत लागून पैसे काढण्याची पद्धत आपण एटीएम ...

×