Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » राणेंचे डिपॉझिट जप्त होणार: राऊत

राणेंचे डिपॉझिट जप्त होणार: राऊत

narayan_rane3मुंबई, [४ एप्रिल] – वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. शिवसेना, कॉंगे्रस आणि एमआयएम अशी तिहेरी लढत होत असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेचे पारडे जड आहे. सेनेच्या या बालेकिल्ल्यात आव्हान देण्यासाठी नारायण राणे मैदानात उतरले असले, तरी शिवसेनेने मात्र राणेंना फार महत्त्व देण्यास नकार दिला आहे. राणे हे आमच्यासाठी आव्हान असूच शकत नाही. या ठिकाणी एमआयएम दुसर्‍या क्रमांकावर राहील आणि राणे यांचे डिपॉझिट जप्त होईल, असे भाकीत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केले आहे.
एमआयएमने शिवसेनेच्याच मदतीसाठी आपला उमेदवार उभा केला असून, हा पक्ष म्हणजे शिवसेना-भाजपाचेच पिल्लू आहे, असा आरोप नारायण राणे यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना विनायक राऊत यांनी राणेंवर टीकेची तोफ डागली.
एमआयएमला भाजपा-शिवसेनेचे पिल्लू म्हणणारे हेच नारायण राणे काही दिवसांपूर्वी या पक्षाची पायधरणी करीत होते. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याआधी ‘चेंबूर नाक्यावरचा कोंबडीचोर’ जुहू चौपाटीवर ९ मजली आलिशान इमारतीत कसा काय राहतो, या प्रश्‍नाचे उत्तर राणेंनी द्यावे, असा घणाघात राऊत यांनी केला.
‘राणेंनी आपला हा पैसा जादू करून निर्माण केला, की तो तेलगीचा?’ असा टोकदार सवाल विनायक राऊत यांनी केला. खादाड वृत्ती आणि दुसर्‍यांना शहाणपण शिकवणे हा नारायण राणेंचा धंदाच आहे, अशी बोचरी टीकाही राऊत यांनी केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21887

Posted by on Apr 6 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1822 of 2452 articles)


झेलमचे पाणी श्रीनगरमध्ये घुसले भूस्खलनामुळे २१ ठार लष्कराचे ऑपरेशन मेघराहत-२ सुरू राज्य शासनाकडून २३५ कोटी = श्रीनगर, [३० मार्च] ...

×