Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » राफेल करारावर भारत-फ्रान्सची मोहर

राफेल करारावर भारत-फ्रान्सची मोहर

modi-parrikar1नवी दिल्ली, [२३ सप्टेंबर] – क्षेपणास्त्र व शस्त्र प्रणालीने सुसज्ज असलेली ३६ राफेल ही अत्याधुनिक लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी भारताने आज शुक्रवारी फ्रान्ससोबत ७.८७ अब्ज युरो (५९ हजार कोटी) बहुप्रतिक्षित करारावर स्वाक्षरी केली. ही अत्याधुनिक विमाने मिळाल्यामुळे परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानपेक्षा भारतीय वायुसेनेची ताकद वाढणार आहे.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि भारत दौर्‍यावर असलेले फ्रान्सचे संरक्षणमंत्री जीन ली ड्रियान यांनी या करारावर स्वाक्षरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ महिन्यांपूर्वीच्या आपल्या फ्रान्स दौर्‍यात ३६ राफेल विमाने खरेदी करण्याची घोषणा केली होती.
कॉंग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या काळात रखडलेल्या प्रस्तावात सुधारणा करून भारताने नव्याने फ्रान्ससोबत वाटाघाटी केल्या व यामुळे देशाचे ७५० दशलक्ष युरो वाचले. याशिवाय ५० टक्क्यांच्या ऑफसेट कलमालाही मान्यता मिळाली. या कलमानुसार भारताच्या लहान-मोठ्या व्यावसायिकांना सुमारे तीन अब्ज युरोचे काम मिळणार आहे. ३६ महिन्यांनंतर भारताला ही लढाऊ विमाने मिळण्यास प्रारंभ होईल आणि करारावर स्वाक्षरी झाल्याच्या तारखेपासून ६६ महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
राफेल ही अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली विमाने मीटीओर व स्कॅल्प या क्षेपणास्त्रांनी सज्ज आहेत. त्यामुळे भारतीय वायुसेनेची क्षमता बरीच वाढणार आहे. यामध्ये बसविण्यात आलेल्या बियॉंड व्हिज्युअल रेंज (बीव्हीआर) या मीटीओर हवेतून हवेत मारा करण्यास सक्षम असलेल्या क्षेपणास्त्राची मर्यादा १५० किमीपर्यंत आहे. राफेल विमानांमध्ये हे क्षेपणास्त्र बसविल्याचा अर्थ असा की, भारत आपल्याच प्रादेशिक सीमेत राहून उत्तरी व पूर्व सीमारेषेसह थेट पाकिस्तानमध्ये मारा करू शकतो.
सूत्रांच्या मते या ३६ राफेल विमानांची मूळ किंमत ३.४२ अब्ज युरो इतकी आहे. त्यावर इतर युद्धसामुग्री बसविण्यासाठी ७१० दशलक्ष युरो आणि भारताला हव्या असलेल्या सुधारणा करण्यासाठी १७०० दशलक्ष युरो खर्च येणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29291

Posted by on Sep 24 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (95 of 2453 articles)


=शरीफांच्या भाषणावर भारताचे टीकास्त्र= नवी दिल्ली, [२२ सप्टेंबर] - एकीकडे संपूर्ण जग दहशतवादाविरोधात एकवटत असताना दुसरीकडे पाकिस्तान मात्र याबाबत नकारघंटाच ...

×