Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » रामदेव बाबा आणणार स्वदेशी मॅगी

रामदेव बाबा आणणार स्वदेशी मॅगी

=नेस्लेने माफी मागावी=
India Politicsनवी दिल्ली, [७ जून] – नेस्ले या बहुराष्ट्रीय कंपनीची मॅगी देशातून हद्दपार झाल्यानंतर प्रख्यात योग गुरू बाबा रामदेव यांनी स्वदेशी मॅगी बाजारात आणण्याची घोषणा केली असून, हानिकारक तत्त्वांसह मॅगी बनविणार्‍या नेस्ले कंपनीने माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पतंजलीतर्फे बाजारात आणल्या जाणार्‍या आरोग्याला पोषक अशा नूडल्समध्ये गरजेपेक्षा जास्त मैदा असणार नाही, असे रामदेव यांनी रविवारी येथे सांगितले. आम्ही मुलांना तोच स्वाद आणि त्यांची पसंत पुन्हा परत देण्याचा प्रयत्न करू. या स्वदेशी नूडल्समध्ये कोणताही हानिकारक घटक असणार नाही, अशी ग्वाही रामदेव यांनी यावेळी दिली. देशातील जनतेला स्वदेशीबाबत प्रेरित करणे, हे आमचे मुख्य लक्ष्य आहे आणि यासाठी आम्ही कमी किमतीत दर्जेदार पदार्थ उपलब्ध करून देऊ, असा दावाही त्यांनी केला. लोकांनी स्वदेशी वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन करतानाच, तुमच्या मुलांना विष खाऊ घालतील, अशा कंपन्या आम्हाला मुळीच नकोत. नेस्लेच्या मॅगीने देशाचे खूप नुकसान केले आहे, असेही ते म्हणाले.
देशभरात मॅगीवर बंदी घालण्यात आल्यानंतर बाबा रामदेव यांच्या पतंजली योग विद्यापीठात तयार कथित मॅगीचे छायाचित्र सोशल मीडियातून देशभरात व्हायरल झाले. मात्र, पतंजली कोणत्याही प्रकारचे नूडल्स बनवत नाही आणि काही लोकांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केले, असा खुलासा रामदेव यांनी यावेळी केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22728

Posted by on Jun 8 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1655 of 2453 articles)


=मतदार याद्या अद्ययावत करणार= नवी दिल्ली, [७ जून] - याचवर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोग चार विशेष पथकं उद्या ...

×