Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » रामनाथ कोविंद बिहारचे नवे राज्यपाल

रामनाथ कोविंद बिहारचे नवे राज्यपाल

=आचार्य देवव्रतांकडे हिमाचलची सूत्रे=
Ram Nath Kovind and Acharya DevVratनवी दिल्ली, [८ ऑगस्ट] – विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर असलेल्या बिहारचे नवे राज्यपाल म्हणून केंद्र सरकारने आज शनिवारी रामनाथ कोविंद यांची नियुक्ती केली. तर, आचार्य देवव्रत यांच्याकडे हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
बिहारमध्ये येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणूक होत आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच नितीशकुमार सरकार आपल्या सोयीनुसार पोलिस व प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बदल्या करीत असताना, कोविंद यांची बिहारच्या राज्यपालपदी करण्यात आलेली नियुक्ती म्हणजे केंद्राचा मुख्यमंत्री नितीशकुमार यांना जोरदार धक्काच मानला जात आहे.
१९९४ आणि २००६ असे दोन वेळा राज्यसभेचे सदस्य राहिलेले कोविंद हे मूळचे उत्तरप्रदेशच्या कानपूर येथील आहेत. आतापर्यंत बिहारचा अतिरिक्त पदभार पश्‍चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे होता. व्यवसायाने वकील असलेले कोविंद हे भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्षही आहेत.
याबाबतची केंद्राची शिफारस मान्य करताना, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कोविंद यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे आचार्य देवव्रत यांना हिमाचलचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले, असे राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
नितीशकुमार नाराज
दरम्यान, कोविंद यांच्या नियुक्तीवर मुख्यमंत्री नितीशकुमार नाराज झाले आहेत. अशा नियुक्त्यांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री संबंधित राज्यसरकारशी किंवा मुख्यमंत्र्यांचे मत विचारात घेत असते. पण, या प्रकरणात केंद्र सरकारने माझ्याशी सल्लामसलत केली नाही. प्रसारमाध्यमांतूनच मला याबाबतची माहिती मिळाली, अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23583

Posted by on Aug 9 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1532 of 2453 articles)


रामेश्वरम, [३० जुलै,] - भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांना रामेश्वर येथे त्यांच्या मूळ गावी अंत्यंत ...

×