Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » राममंदिराबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर निर्णय

राममंदिराबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर निर्णय

=कलराज मिश्र यांची माहिती=
Kalraj_Mishra1अलाहाबाद, [८ फेब्रुवारी] – अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असून, ही याचिका निकाली निघाल्यानंतर केंद्रातील भाजपाप्रणीत रालोआ सरकार अयोध्येत राममंदिर बांधण्याच्या दिशेने पावले उचलणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते कलराज मिश्र यांनी दिली.
राममंदिराबाबत आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करायलाच हवी. त्यानंतर काय स्थिती निर्माण होते, याचा अभ्यास करून केंद्र सरकार योग्य ते पाऊल उचलणार आहे, असे मिश्र यांनी रविवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अयोध्येत राममंदिर बांधण्याच्या भाजपाच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. पण, आम्हाला मतैक्याने हा प्रश्‍न सोडवायचा आहे, असे सांगताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वच धार्मिक स्थळांना भेट देत असल्याने त्यांनी अयोध्येतील राममंदिराचेही दर्शन घेण्यात गैर काहीच नाही. धार्मिक नेत्यांना शक्य तितक्या लवकर राममंदिर हवे आहे. आम्ही त्यांच्या भावनांचा सन्मान करतो. पण, न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करायलाच हवी आणि अंतिम निर्णय पंतप्रधानांनाच घ्यायचा आहे, हेदेखील धार्मिक नेत्यांनी लक्षात घ्यायला हवे. राममंदिराला सर्वधर्मियांचा पाठिंबा मिळावा, असाच आमचा प्रयत्न असून, मतैक्य घडविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26801

Posted by on Feb 9 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (838 of 2453 articles)


=गुंतवणुकीसाठी राज्यात मोठ्या संधी : फडणवीस= मुंबई, [८ फेब्रुवारी] - महाराष्ट्रात उद्योग उभारणीसाठी ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’च्या माध्यमातून पायाभूत सुविधांसह ...

×