Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » रालोआ सरकार गरिबांना समर्पित : पंतप्रधान

रालोआ सरकार गरिबांना समर्पित : पंतप्रधान

=गरिबी हटावचा मार्ग चुकला=
narendra-modi-11बालासोर, [२ जून] – भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे सांगितले.
केंद्र सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते.
सरकार श्रीमंतांसाठी नव्हे तर, गरिबांसाठी असते. सरकारने गरिबी निर्मूलनासाठी लढा देण्याची गरज असते. जोपर्यंत या समस्येवर वैज्ञानिक पद्धतीने तोडगा काढला जात नाही तोपर्यंत गरिबी निर्मूलन करणे शक्य नाही, असे सांगताना, माझे सरकार गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित असल्याचे मोदी म्हणाले. मी ज्यावेळी असे म्हणतो त्यावेळी विकासाच्या बाबतीत कोणतेही राज्य मागे राहू नये, असा त्याचा अर्थ आहे. संतुलित विकास होऊन प्रत्येकाला त्याचा फायदा झाला पाहिजे. यासाठी गरिबांना केंद्रस्थानी ठेवून योजना तयार झाल्या पाहिजे, असे मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
गरिबी हटावचा मार्ग चुकला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सुमारे तासभराच्या भाषणात कॉंग्रेसच्या गरिबी हटाव, या घोषणेवर खरपूस टीका केली. हा नारा देणार्‍यांचा हेतू चांगला असला तरी हे आश्‍वासन पूर्ण करण्यासाठी त्यांनी जो मार्ग निवडला तो चुकीचा होता. आम्ही गेल्या ६० वर्षांपासून देशात गरिबी हटावचा नारा ऐकत आहोत. त्यामुळे केवळ गरिबी, बेरोजगारी आणि आजार वाढले, असा टोलाही पंतप्रधानांनी लगावला.
सरकारचे मूल्यमापन आवश्यक
सामान्य जनतेकडून सरकारच्या कामकाजाच्या मूल्यमापनाचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, माझ्या सरकारने केलेले काम व खर्च केलेल्या प्रत्येक पैशाचा हिशेब द्यायलाच हवा. मात्र, यापूर्वी कोणत्याही सरकारने असा हिशेब दिला नाही.
भाजपाशासीत राज्ये आघाडीवर
भाजपा कार्यकर्ता या नात्याने विकास हाच माझा मंत्र आहे. त्यामुळेच भाजपाशासीत राज्यांमध्ये चांगला विकास झाला. परंतु, भाजपा सत्तेत नसलेल्या राज्यांच्या स्थितीची तुम्हाला कल्पना आहे, असे मोदी म्हणाले. देशाच्या पूर्व भागाचाही वेगाने विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या राज्यांना नैसर्गिक स्रोतांचे वरदान लाभले आहे. तुमच्याकडे समुद्र आणि कोळशाच्या खाणी आहेत. मात्र, तरीही तुम्ही गरीब का आहात, असा प्रश्‍न मोदींनी उपस्थितांना विचारला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28511

Posted by on Jun 3 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (263 of 2453 articles)


ओसाका, [२ जून] - वेगाने विकास करणारी जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था हा मान कायम ठेवण्यासाठी आर्थिक सुधारणांचा अजेंडा जोमाने राबविणार ...

×