Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » राष्ट्रगीतातून ‘अधिनायक’ शब्द वगळा: कल्याणसिंह

राष्ट्रगीतातून ‘अधिनायक’ शब्द वगळा: कल्याणसिंह

=‘अधिनायक’ म्हणजे इंग्रजांची प्रशंसा=
kalyansinghजयपूर, [८ जुलै] – भारताच्या राष्ट्रगीतात असलेल्या ‘अधिनायक’ या शब्दाचा अर्थ इंग्रजांची प्रशंसा असा होत असल्याने आणि इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपला भारत देश मुक्त झाला असल्याने हा शब्दच आपल्या राष्ट्रगीतातून वगळण्यात यावा, अशी मागणी राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह यांनी केली आहे.
राजस्थान विद्यापीठाच्या २६ व्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करताना कल्याणसिंह यांनी आपली भूमिका विशद केली. राष्ट्रगीताचे रचनाकार रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे. त्यामुळे त्यांचा अपमान करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. पण, एक मात्र खरे की, राष्ट्रगीतातील ‘अधिनायक’ हा शब्द इंग्रजांची प्रशंसा करणाराच आहे, असे माझे मत आहे.
राज्यपालांच्या नावासमोर ‘महामहीम’ हा शब्द वापरण्यावरही कल्याणसिंह यांनी आक्षेप घेतला. ‘महामहीम’ हा शब्द ब्रिटिश गव्हर्नरला सन्मान देण्यासाठी वापरला जात होता. त्यामुळे या शब्दाऐवजी राज्यपालांसाठी ‘माननीय’ असा शब्दप्रयोग करायला हवा, असेही कल्याण सिंह यांनी नमूद केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23309

Posted by on Jul 8 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1574 of 2453 articles)


=नवी चमू गठित, एम. जे. अकबर, श्रीकांत शर्मा यांचा समावेश= नवी दिल्ली, [८ जुलै] - केंद्रात आणि काही राज्यांमध्ये सत्तेवर ...

×