Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » राष्ट्रवादावर तडजोड नाही : जेटली

राष्ट्रवादावर तडजोड नाही : जेटली

=केंद्रात आता निर्णय घेणारे आणि काम करणारे सरकार=
arun-jaitley2नवी दिल्ली, [२० मार्च] – केंद्रातील आतापर्यंतचे सरकार दिशाहिन होते, आता मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात निर्णय घेणारे आणि काम करणारे सरकार केंद्रात आले असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज रविवारी सांगितले. आपल्या घटनेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले, तरी राष्ट्रवादाच्या मुद्यावर भाजपा कोणतीही तडजोड करणार नाही, असे ते म्हणाले.
भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या दुसर्‍या दिवशी पारित राजकीय ठरावाची माहिती पत्रपरिषदेत माहिती देताना जेटली म्हणाले की, आमचे सरकार सामाजिक न्याय आणि सुशासनाच्या मुद्यावर चालत आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हा आमचा अजेंडा आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आम्हीही पुरस्कर्ते आहोत, पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आम्ही राष्ट्रवादाशी कोणतीही तडजोड खपवून घेणार नाही. समाजात असहमती दर्शविण्याचे आणि विरोध करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे, मात्र देश तोडण्याचे नाही. भारतमाता की जयच्या मुद्यावर कोणताही वाद होऊ नये, अशी आमची भूमिका आहे.
कित्येक वषार्र्ंपासून प्रलंबित असलेल्या अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर सरकारने निर्णय घेतले नव्हते, आम्ही मात्र देशहिताच्या सर्व प्रमुख मुद्यांवर धोरणात्मक निर्णय घेतले, याकडे लक्ष वेधत जेटली म्हणाले की, नागालॅण्डच्या संदर्भात आम्ही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, बांगलादेशबाबत गावांच्या हस्तांरणाचा करार केला. निवृत्त सैनिकांसाठी ‘वन रँक वन पेन्शन’चा निर्णय घेतला. जम्मू-काश्मीरसाठी तयार करण्यात आलेल्या सुशासनाच्या धोरणावर आजही आम्ही ठाम आहोत.
राजकीय ठरावात राष्ट्रीय महत्त्वाच्या अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांचा समावेश आहे, असे स्पष्ट करीत जेटली म्हणाले की, ईशरत जहॉं प्रकरणात कॉंग्रेसच्या सरकारने देशाच्या सुरक्षेशी खेळ केला. देशाच्या संरक्षण साहित्याच्या खरेदीसाठी सरकारने तातडीने पारदर्शी पण सहज सुलक्ष प्रक्रिया तयार केली.
वैश्‍विक मंदीच्या पार्श्‍वभूमीवर भारताची अर्थव्यवस्था आगेकूच करीत आहे. विकासाचा दर वाढत आहे, मात्र याचा फायदा गरीब आणि ग्रामिणांना मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे गरिबी निर्मूलनाचे धोरण आम्ही तयार केले आहे. दलित समाजातील उद्योजकांना संस्थागत स्तरावर उभे करण्याचा आमचा निर्धार आहे, याकडे जेटली यांनी लक्ष वेधले.
आसाम, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्‍चिम बंगाल या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका भाजपा पूर्ण तयारीने लढणार आहे. यातील काही ठिकाणी आमची खूप ताकद नसली, तरी सर्व राज्यांत यानिमित्ताने आम्हाला आमची ताकद वाढवायची आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. आसाम आणि केरळमध्ये आम्हाला चांगली संधी आहे. ज्या राज्यात आमची संघटनात्मक ताकद कमी होती, तिथे सदस्यता अभियान आणि पंचायत निवडणुकांच्या माध्यमातून आम्ही ताकद वाढवली आहे. यावेळी भाजप प्रवक्ते एम. जे. अकबर, श्रीकांत शर्मा उपस्थित होते.
उत्तराखंडमधील संकटाला कॉंग्रेसच जबाबदार
उत्तराखंडमधील राजकीय पेचप्रसंगाच्या स्थितीसाठी कॉंग्रेसला जबाबदार धरत जेटली म्हणाले की, उत्तराखंडमध्ये राजकीय संकट आले आहे. आम्ही वित्त विधेयकाच्या विरोधात मतदान केले, असे तेथील बहुमतातील आमदारांचे म्हणणे आहे, मात्र विधानसभेच्या अध्यक्षांनी आवाजी मतदानाने ते पारित झाल्याचे जाहीर केले. फेटाळल्या गेलेले विधेयक पारित झाल्याचे समजण्याची देशाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. अभूतपूर्व परिस्थिती तिथे निर्माण झाली आहे आणि यासाठी कॉंग्रेसच जबाबदार आहे. बिहार, पश्‍चिम बंगाल आणि तामिळनाडूत कॉंग्रेसने आपला राजकीय स्तर खूप खाली आणला आहे. उत्तराखंडमधील स्थितीवर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाही, तर कॉंग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत चर्चा होण्याची गरज असल्याचे एका प्रश्‍नावर जेटली यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27489

Posted by on Mar 21 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (602 of 2453 articles)


मुंबई, [२० मार्च] - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता ऍक्सिस बँकेत उपाध्यक्ष असल्याने मुख्यमंत्र्यांनी एसआरएच्या विकासकांना ऍक्सिस बँकेत खाते ...

×