Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड

sharad-pawar_3पाटणा , [१० जून] – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची आज बुधवारी फेरनिवड करण्यात आली. पाटण्यामध्ये पक्षाच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रीय अधिवेशन बोलावण्यात आले आहे. यात हा निर्णय घेण्यात आला.
या पदावर नियुक्ती होण्याची पवार यांची ही सलग सहावी वेळ आहे. पक्षाचे सरचिटणीस टी. पी. पीताम्बर यांनी पवार यांच्या निवडीची औपचारिक घोषणा केली. विशेष म्हणजे, या अधिवेशनाला पवार यांचे पुतणे आणि पक्षाचे आमदार अजित पवार यांनी पाठ दाखविली असल्याने चर्चेला उधाण आले होते. अजित पवार का अनुपस्थित राहिले, याचे उत्तर बैठकीत उपस्थित कुणाजवळही नव्हते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हे अधिवेशन बोलावण्यात आले आहे. दरम्यान, शरद पवार यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासोबत मंगळवारी रात्री जेवण घेतल्याने राष्ट्रवादी पक्षही जनता परिवाराच्या महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या अधिवेशनात आज वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत आहे. बिहारच्या निवडणुकांच्या निमित्ताने आपली ताकद वाढविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22810

Posted by on Jun 11 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1637 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१० जून] - म्यानमारमधील लष्करी कारवाई हा शेजारील सर्वच देशांमध्ये आश्रयात असलेल्या दहशतवादी गटांना एकप्रकारचा इशाराच आहे. आमच्या ...

×