Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » राष्ट्रवादी भुजबळांच्या पाठीशी : शरद पवार

राष्ट्रवादी भुजबळांच्या पाठीशी : शरद पवार

SHARAD PAWARनवी दिल्ली, [१५ मार्च] – छगन भुजबळांची अटक राजकीय सूडातून झाली असून राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या पूर्ण पाठीशी असून आम्ही त्यांच्यासाठी कायद्याने लढा देऊ, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची ही पहिली प्रतिक्रिया आहे.
भाजपा नेते ज्याप्रकारे बोलत आहेतते पाहता भुजबळांच्या अटकेची कारवाई राजकारणाने प्रेरित असल्याचे पवार यावेळी म्हणाले. त्यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेस छगन भुजबळांसाठी कायदेशीर लढा लढणार असल्याचे सांगून महाराष्ट्र सदनाबाबतचे निर्णय हे काही एकट्या भुजबळांनी घेतलेले नाही, तर मंत्रिमंडळाचे निर्णय आहेत, असेही पवार म्हणाले.
छगन भुजबळ यांना ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोठेही कायदा आणि सुवस्थेला धक्का पोहोचेल असे जाळपोळ, तोडफोडीसारखे प्रकार करू नये, असे आवाहनही शरद पवार यांनी केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27356

Posted by on Mar 16 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (646 of 2451 articles)


वॉशिंग्टन, [१५ मार्च] - अमेरिकेतील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणार्‍या भारतीय युवकांना देशाबाहेर घालवू नका, कारण अमेरिकेला या स्मार्ट युवकांची खर्‍या ...

×