Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » राष्ट्रहितासाठी हिंदूंनी संघटित व्हावे

राष्ट्रहितासाठी हिंदूंनी संघटित व्हावे

  • सरसंघचालकांचे आवाहन
  • रा. स्व. संघाच्या अहमदाबाद शिबिराचा समारोप

dr.Mohan-bhagwatअहमदाबाद, [४ जानेवारी] – भारत एक हिंदू राष्ट्र आहे. या देशात राहाणार्‍या प्रत्येकानेच हा देश आपला मानायला हवा. हिंदू समाज संकटात आला तर, संपूर्ण भारत देशही संकटात सापडेल म्हणून सर्व हिंदूंनी राष्ट्रहितासाठी एकत्र आले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज रविवारी येथे केले.
रा. स्व. संघाच्या तीन दिवसीय शिबिराच्या समारोपप्रसंगी बोलताना ते म्हणाले, हे हिंदू राष्ट्र असल्याने या देशाचे रक्षण करण्याचे आणि जागतिक पातळीवरील आपल्या जबाबदार्‍या पूर्ण करण्याची क्षमता प्रदान करण्याचे दायित्व हिंदू समाजालाच पार पाडायचे आहे. यासाठी सर्व हिंदूंनी एकसंध होणे आवश्यक आहे. तसे झाले तर जगातील सर्वात प्रगत देश होण्यापासून भारताला कोणीही रोखू शकणार नाही.
अनेकतेतही देशाची एकता कायम आहे आणि समाजातील सर्व घटकांना सारखाच सन्मान मिळत आहे, ही आनंदाची बाब आहे, अशा शब्दात त्यांनी समाधान व्यक्त केले. तथापि, हिंदू समाजाला आणखी शक्तिशाली बनविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे ते म्हणाले.
राष्ट्र उभारणी आणि देशवासीयांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्याचे मोठे कार्य रा. स्व. संघ करीत आहे. हे महान कार्य संघाने हाती घेतले आणि ते पूर्ण होईपर्यंत सुरूच राहणार आहे. बाहेरून वरवर पाहून रा. स्व. संघाचे कार्य ओळखता येणार नाही. त्यासाठी संघात या आणि कार्य जवळून बघा. संघ जे कार्य करीत आहे, ते खरोखरच उत्तम आहे, असे जर तुमचे मत झाले तर संघाचे सदस्य व्हा, असे आवाहन सरसंघचालकांनी केले. अनेक वर्षांनंतर का होईना, संघाच्या कार्याचे महत्त्व अनेक लोकांना पटले आहे, पटत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19455

Posted by on Jan 5 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (2286 of 2453 articles)


अकोला, [४ जानेवारी] - विश्‍वविख्यात माजी धावपटू व फ्लाईंग सिख म्हणून ओळखला जाणारा मिल्खा सिंग यंदा अकोलावासींसोबत धावणार आहेत. इंडियन ...

×