Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » राष्ट्राभिमान दुखवाल तर याद राखा

राष्ट्राभिमान दुखवाल तर याद राखा

=गृहमंत्री राजनाथसिंह यांचा पाकला इशारा=
RAJNATH_SINGH_19नीमच, [२७ जुलै] – पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज सोमवारी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. पाकसोबत आम्हाला चांगले संबंध ठेवायचे आहेत. पण, कुणी जर आमच्या राष्ट्राभिमानावरच आघात करीत असेल, तर त्यांना आम्ही धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले.
पाकसोबत मैत्रीचे संबंध ठेवण्याची आपली इच्छा भारताने वारंवार व्यक्त केली असतानाही, पाक सीमेपलीकडून भारतात अतिरेकी का पाठवितो, हे मला अद्यापही समजले नाही. आम्हाला शेजार्‍यांशी चांगले संबंध हवे आहेत, शांतता हवी आहे. पण, राष्ट्राभिमान पणाला लावून असे संबंध आणि शांतता आम्हाला मान्य नाही, असे राजनाथसिंह यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आम्ही कुणावरही प्रथम हल्ला करणार नाही. सीमेवर चालणारी पहिली गोळीदेखील आमच्या बंदुकीतून निघालेली नसेल. पण, आम्हाला कुणी डिवचल्यास आम्ही शांत बसणार नाही. सडेतोड प्रत्युत्तर देऊच, असा इशारा त्यांनी दिला. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ७६ व्या वर्धापनदिनानिमित्त येथे आयोजित सीआरपीएफच्या परेडकडून मानवंदना स्वीकारण्यासाठी राजनाथसिंह येथे आले होते.
भारत आणि पाकमध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित व्हावे, यासाठी भारताकडून आजवर झालेल्या प्रयत्नांची माहिती देताना गृहमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शपथविधी सोहळ्यात पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आमंत्रित केले. पण, पाकने भारताचा विश्‍वासघात केला. त्यानंतरही नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या ऊफा येथे शरीफांची भेट घेतली. पण, या भेटीला एक दिवस होत नाही तोच पाकने भारताला चक्क अणुयुद्धाची धमकी दिली. यावरून पाकला भारतासोबत मैत्रीचे संबंधच मान्य नाहीत, असेच दिसून येते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23516

Posted by on Jul 28 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1545 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२७ जुलै] - फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीबाबत विशेष टाडा न्यायालयाने जारी केलेल्या आदेशाला आव्हान देणार्‍या १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट ...

×