Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » राष्ट्रीयतेच्या मुद्यावर भारत-बांगलादेशचे सर्वेक्षण सुरू

राष्ट्रीयतेच्या मुद्यावर भारत-बांगलादेशचे सर्वेक्षण सुरू

India-Bangladesh-border-mapढाका, [६ जुलै] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या महिन्यातील बांगलादेश दौर्‍यात झालेल्या ऐतिहासिक सीमा करारानुसार येत्या ३१ जुलैपूर्वी आपापल्या क्षेत्रात येणार्‍या भूभागाच्या एकत्रीकरणाचा भाग म्हणून एकदुसर्‍याच्या सीमाक्षेत्रात येणार्‍या १६२ वस्त्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या ५१,५८१ नागरिकांची कोणत्या देशाला पसंती आहे हे जाणून घेण्यासाठी आज सोमवारपासून संयुक्त सर्वेक्षण हाती घेण्यात आले.
याबाबत अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार ५० पथकांनी बांगलादेशातील १११ भारतीय वस्त्या आणि २५ पथकांनी अशाचप्रकारच्या भारतात असलेल्या ५१ वस्त्यांमध्ये सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात केली. दोन्ही देशांच्या पथकांकडून येत्या २३ जुलैपर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले जाईल, अशी अपेक्षा आहे. सुमारे ४१ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सीमा वादावर भूमीचे आदानप्रदान करून तोडगा काढण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांमध्ये झालेल्या ऐतिहासिक करारानंतर महिनाभरातच हे काम सुरू करण्यात आले आहे.
सर्वेक्षण करणार्‍या पथकांमध्ये दोन्ही देशांचे प्रत्येकी पाच-पाच प्रतिनिधी आहेत आणि तुम्हाला कोणत्या देशाचे नागरिकत्व स्वीकारायला आवडेल, असा प्रश्‍न या पथकांकडून नागरिकांना विचारला जाणार आहे. पुढील १६ दिवसांत हे सर्वेक्षण पूर्ण करून दोन्ही देशांच्या संबंधित प्रशासनांना आपला अहवाल सादर करायचा आहे, असे गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. भारत-बांगलादेश यांचे संयुक्त दल सर्वेक्षणाला अंतिम रूप देईल आणि इच्छुक भारतीय व बांगलादेशी नागरिकांची यादी तयार करण्यात येईल आणि त्यानंतर दोन्ही देशांची सरकारे ३१ जुलैपर्यंत यादीला अंतिम स्वरूप देऊन नागरिकांच्या पसंतीनुसार त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था केली जाणार आहे.
बांगलादेशात असलेल्या १११ भारतीय वस्त्यांमध्ये ३७,३६९, तर भारतीय हद्दीत असलेल्या ५१ बांगलादेशी वस्त्यांमध्ये १४,२१५ लोक वास्तव्यास आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23282

Posted by on Jul 7 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1583 of 2458 articles)


=कॉंग्रेसची मागणी= नवी दिल्ली, [६ जुलै] - मध्यप्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळातील (व्यापमं) घोटाळ्याशी कथित संबंध असलेल्या ४५ जणांचा आतापर्यंत मृत्यू ...

×