Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » रासायनिक रंगांमुळे आरोग्यासोबत जल, भूमीही प्रभावित!

रासायनिक रंगांमुळे आरोग्यासोबत जल, भूमीही प्रभावित!

=ताज्या अभ्यासातील निष्कर्ष=
holi-powder-colorsनवी दिल्ली, [२२ मार्च] – फार आधीच्या काळात दिवाळी आणि होळी हे दोन सण मनुष्याला आगळाच आनंद देणारे ठरत असायचे. आपले सर्व दु:ख विसरून मनुष्य या सणांचा आनंद घ्यायचा. पण, आता हेच दोन्ही सण मानवी आरोग्यालाच नव्हे, तर पाणी आणि भूमीलाही प्रभावित करीत आहेत.
विशेषत: होळीसाठी रासायनिक रंगांची निमिती केली जात असल्याने, या रंगांमुळे मानवी आरोग्यावर होणारा परिणाम तत्काळ दिसून येतो. तर, त्याचे जल आणि भूमीवर होणारे भीषण परिणाम काही काळाने दिसून येत आहेत. दिवाळीत ज्या प्रमाणे फटाक्यांच्या प्रदूषणामुळे मानवी जीवन व पर्यावरण प्रभावित होत असते, त्याचप्रमाणे होळीच्या रंगांमुळेही मानवी जीवन व पर्यावरण प्रभावित होत असल्याचे जागतिक संशोधकांना त्यांच्या अभ्यासात दिसून आले आहे.
होळीकरिता कृत्रिम रंगांचा वापर फार जास्त प्रमाणात केला जात असतो. संपूर्ण पृथ्वीच या रंगात रंगली असते. या रंगातील रसायनांमुळे पाणी आणि जमिनीचा सुपिकपणा दोन्हीवर प्रतिकूल परिणाम होतो. या रंगांमध्ये ऍसिड, मिका, ग्लास पॉवडर आणि अल्कालिस यासारखी घातक रसायने मिसळवलेली असतात. शरिराला लावण्यात आलेले किंवा जमिनीवर पसरलेले हे रंग इतक्या सहजासहजी निघत नसतात. फार आधीच्या काळात केवळ पाण्यानेही रंग निघून जायचा. पण, आजच्या रंगांवर ही नैसर्गिक पद्धत प्रभावी नसल्याचे या अभ्यासातील एक संशोधक प्रा. अनुराग घोष यांनी म्हटले आहे.
जमिनीवर पडलेला हाच रंग मातीत मिसळतो आणि अन्नधान्य व भाजीपाल्यालाही तो प्रभावित करीत असतो. तेच धान्य व भाजीपाला आपण खात असल्याने आरोग्यही धोक्यात येत असते. विशेषत: लाल, हिरवा आणि काळ्या रंगात कॉपर सल्फेट फार जास्त प्रमाणात मिसळण्यात येत असल्याने हे रंग अधिकच घातक असतात. कोरड्या त्वचेवर जेव्हा हे रंग लावले जातात, तेव्हा त्याचे परिणाम दीर्घकाळपर्यंत पाहायला मिळतात. कारण, उग्र रसायन असलेले रंग अशा त्वचांमध्ये लवकरच अंतर्भूत होतात, याकडेही घोष यांनी लक्ष वेधले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27538

Posted by on Mar 23 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (585 of 2453 articles)


=भाजपा आजपासून शहीद दिवस पाळणार= नवी दिल्ली, [२२ मार्च] - शहिदांचा अपमान करणारे विधान केल्याबद्दल कॉंग्रेस पक्षाने तसेच या पक्षाचे ...

×