Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » राहुल गांधींना सहन करणारी कॉंग्रेसच खरी सहिष्णू

राहुल गांधींना सहन करणारी कॉंग्रेसच खरी सहिष्णू

=अनुपम खेर यांचा चिमटा=
Anupam-Kher in kolkataनवी दिल्ली, [६ मार्च] – सहिष्णू व असहिष्णुतेच्या मुद्यावर विरोधकांनी राजकारण सुरू केले असताना, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी कॉंग्रेसला चांगलेच धारेवर धरले आहे. या मुद्यावर सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले खेर यांनी यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू घेतली आहे. राहुल गांधी यांना सहन करणारी कॉंग्रेसच खरी सहिष्णू असल्याचे सांगत कॉंग्रेस नेत्यांचा त्यांनी चांगलाच चिमटा काढला.
देशात असहिष्णुता वाढीला लागली आहे, अशी ओरड करणार्‍यांना आणि कॉंग्रेस उपाध्यक्षांना त्यांनी आपल्या टीकेचे लक्ष्य केले. ज्या नेत्याला देशाचा पंतप्रधान करण्याची भाषा हा पक्ष करीत आहे, त्या राहुल गांधी यांनाच सहन करण्याची वेळ कॉंग्रेसवर येऊन ठेपली आहे. त्यांची सहनशक्ती बघितल्यावर तेच खरे सहिष्णू असल्याची माझी खात्री पटली आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगातही कॉंगेस पक्षाइतकी सहनशक्ती कोणातच नसल्याची उपरोधिक टीकाही त्यांनी एका चर्चासत्रात बोलताना केली. सामान्यांना या विषयाशी काहीही देणेघेणे नाही. पण निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्याचा घाव कॉंग्रेसच्या जिव्हारी लागला आहे आणि यामुळेच बिथरलेला कॉंग्रेस पक्ष याचा वचपा काढण्याचा प्रयत्न करीत आहे. गुलामगिरीची सवय झालेल्या या लोकांना चहा विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान होतो ही गोष्ट पचनी पडलेली नाही, हेच यातून दिसून येत असल्याचे सांगत, नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाच्या दहा टक्के काम जरी राहुल गांधी यांनी करून दाखविले, तर माझे मत मी त्यांनाच देईल, असेही अनुपम खेर यांनी जाहीर केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27080

Posted by on Mar 6 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (747 of 2453 articles)


नवी दिल्ली, [६ मार्च] - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) गेल्या महिन्यात देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांवरून उद्‌भवलेल्या वादाचे पडसाद अजूनही कायम ...

×