राहुल गांधीच कॉंगे्रसचे भावी अध्यक्ष
Sunday, January 18th, 2015=सोनियांचे प्रदेश कॉंगे्रस समित्यांना पत्र=
नवी दिल्ली, [१७ जानेवारी] – सततच्या पराभवांमुळे कॉंगे्रस पक्षात नेतृत्वाच्या मुद्यावरून कलह निर्माण झाला असतानाच, कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सर्व राज्यांच्या प्रदेश कॉंगे्रस समित्यांना पत्र लिहून, राहुल गांधी हेच पक्षाचे भावी अध्यक्ष राहणार आहेत, असे स्पष्ट संकेत दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाच पुढे जाऊन कॉंगे्रसचे नेतृत्व करायचे आहे. विकास आणि उदारतावादी विचारातून राहुल गांधीच देशाला पुढे नेणार आहेत. पक्षाला मजबूत करण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच असल्याने पक्षजनांनी त्यांच्या नेतृत्वाचा फायदा करून घ्यावा, असे आवाहनही सोनियांनी या पत्रात केले असल्याचे एका वृत्तपत्राच्या वृत्तात म्हटले आहे.
गेल्यावर्षीच्या मे महिन्यात झालेली लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर विविध राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंगे्रस पक्षाच्या पदरी पराभवाशिवाय दुसरे काहीच आले नाही. या पराभवामुळे नेते आणि कार्यकर्ते खचून गेले. त्यातच पक्षाचे वादग्रस्त सरचिटणीस दिग्विजयसिंह आणि अन्य वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व सोपविण्याची मागणी केली. काही नेत्यांनी तर सोनिया व राहुल यांनी विश्रांती घ्यावी आणि गांधी परिवाराबाहेरील व्यक्तीकडे पक्षाची सूत्रे सोपवावी, अशी भूमिका घेतली. पक्षात नेतृत्वाच्या मुद्यावरून कलह निर्माण झाला असतानाच, सोनियांनी या पत्राद्वारे यासंबंधीच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पुढील मार्च किंवा एप्रिलमध्ये अ. भा. कॉंगे्रस समितीचे महाअधिवेशन होण्याची शक्यता असून, या अधिवेशनातच राहुल गांधी यांची पक्षाध्यक्षपदी निवड जाहीर होईल असे बोलले जात आहे. सोनिया गांधी यांची प्रकृती चांगली नसल्याने शक्य तेवढ्या लवकर पक्षाची सूत्रे राहुल गांधींच्या हाती देण्याची सोनियांची योजना आहे. काही वरिष्ठ नेत्यांच्या मते, येत्या सप्टेंबर महिन्यात पक्षात संघटनात्मक निवडणुका होणार असून, तेव्हाच राहुल गांधी यांची अध्यक्षपदी निवड होऊ शकते.
Short URL: https://vrittabharati.in/?p=19792

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!