Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » राहुल गांधी बेजबाबदार, प्रसिद्धीलोलुप नेते

राहुल गांधी बेजबाबदार, प्रसिद्धीलोलुप नेते

=मनोहर पर्रिकर यांचा सणसणीत टोला=
manohar parrikarनवी दिल्ली, [९ मे] – राजकारणातून काही दिवसांची विश्रांती घेऊन परत आलेले कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा टीका सुरू झाली आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर संधान साधले. ‘राहुल गांधी बेजबाबदार नेते असून ते प्रसिद्धीलोलुप आहेत,’ असे मत पर्रिकर यांनी व्यक्त केले आहे.
दोन दिवसांपूर्वी लोकसभेत अमेठीतील मेगा फूड पार्कचा प्रश्‍न राहुल यांनी उपस्थित केला होता. हा प्रकल्प होऊ न देण्यास मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. त्यावर उत्तर देताना पर्रिकर म्हणाले की, त्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही कंपनीने पुढाकार घेतला नाही. ‘स्वत: लोकांमध्ये जाऊन, काम करून निर्माण झालेली प्रतिमा आणि भाडोत्री जनसंपर्क कंपन्यांच्या सहकार्यातून निर्माण झालेला जनसंपर्क यात फरक असतो. लोकप्रियता मिळविण्यासाठी राहुल हपापलेले आहेत. मात्र, तरीही अमेठीतील फूड पार्कसाठी राहुल स्वत: एखादी कंपनी आणणार असतील तर आमचे सरकार त्यांना पूर्ण सहकार्य करेल,’ असे पर्रिकर यांनी स्पष्ट केले. या चर्चेत सहभागी झालेले भाजपा नेते संबित पात्रा यांनी, राहुल पूर्वतयारीशिवाय सभेत येत असल्याची टीका केली. कॉंग्रेसवर हल्लाबोल करताना पर्रिकर म्हणाले की, ‘कोरवामध्ये आयुधनिर्माणीच्या नावावर कॉंग्रेसने २१८ कोटी रुपये खर्च केले. पण, त्यातून अद्याप काहीही उत्पन्न निघालेले नाही.’

Short URL: https://vrittabharati.in/?p=22467

Posted by on May 10 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1716 of 2453 articles)


३० हजारांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन परवानगी शिवाय विदेशात जाण्यावर बंदी पासपोर्ट जप्त १५ जूनला होणार पुढील सुनावणी मुंबई, [८ ...

×