Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » राहुल गांधी यांना नोटीस

राहुल गांधी यांना नोटीस

=ब्रिटिश नागरिकत्वाचा मुद्दा=
PTI3_15_2014_000126Bनवी दिल्ली, [१४ मार्च] – ब्रिटिश नागरिकत्वाच्या मुद्यावरून लोकसभेच्या नैतिकता (इथिक्स) समितीने आज सोमवारी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली. या मुद्यावर राहुल गांधी यांनी आपली बाजू स्पष्ट करावी, असे या नोटिसीत म्हटले आहे. तर, आपण लवकरच संसदेत आपली भूमिका स्पष्ट करू, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
ब्रिटनच्या एका कंपनीत सादर केलेल्या कागदपत्रात आपण ब्रिटिश नागरिक असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता, असे या समितीचे सदस्य अर्जुन मेघवाल यांनी म्हटले. नोटीसवर राहुल गांधी यांचे उत्तर आल्यानंतर त्यांच्यावरील कारवाईबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मेघवाल म्हणाले. या प्रकरणाची तक्रार भाजपा नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्र पाठवून केली होती. ब्रिटनमध्ये नोंदणी करण्यात आलेल्या बॅकऑप्स कंपनीचे संचालक म्हणून काम करण्यासाठी राहुल गांधी यांनी आपण ब्रिटिश नागरिक असल्याचा दावा केला होता, असा डॉ. स्वामी यांचा आरोप होता.
भाजपा खासदार महेश गिरी यांनी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांना पत्र पाठवून राहुल गांधी यांच्या ब्रिटिश नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर सुमित्रा महाजन यांनी हे प्रकरण लोकसभेच्या इथिक्स समितीचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे पाठविले होते. त्यानंतर या समितीने राहुल गांधी यांच्यावर नोटीस बजावत त्यांच्याकडून खुलासा मागवला आहे. व्यक्तिगत सूडबुद्धीने हे प्रकरण उचलण्यात येत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. नोटीस बजावणे हा नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे. राहुल गांधी भारतीय आहे आणि भारतीयच राहतील, असे कॉंग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27311

Posted by on Mar 15 2016. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (662 of 2453 articles)


=मदत व पुनर्वसन मंत्र्यांचे दुष्काळावरील चर्चेला उत्तर= मुंबई, [१४ मार्च] - राज्यातील दुष्काळ, टंचाई परिस्थिती तसेच शेतकर्‍यांच्या आत्महत्या या विषयावर ...

×