Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » राहुल गांधी संवेदनशून्य

राहुल गांधी संवेदनशून्य

=हंसराज भारद्वाज यांचा घरचा अहेर=
hansraj bharwdajनवी दिल्ली, [१५ एप्रिल] – दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी हे अतिशय लोकप्रिय आणि संवेदनशील व्यक्ती होते. पण, त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांच्यात वडिलांचा एकही गुण नाही. राहुल हे संवेदनशून्य आहेत, अशा शब्दात कर्नाटकचे माजी राज्यपाल आणि कॉंगे्रसचे वरिष्ठ नेते हंसराज भारद्वाज यांनी आज शुक्रवारी घरचा अहेर दिला आहे.
राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडण्याची भारद्वाज यांची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपाचा सामना करण्यासाठी कॉंगे्रस सक्षम नसून, राहुल गांधी हे तळागळातील जनतेशी जुळलेले नेते नाहीत, असे भारद्वाज यांनी म्हटले होते.
मुलायम सरकार पाडण्याचा होता कॉंग्रेसचा कट
कॉंग्रेस नेतृत्वाने २००७ मध्ये भ्रष्टाचाराच्या कथित आरोपाखाली मुलायमसिंग यादव यांच्या नेतृत्वातील उत्तरप्रदेश सरकार बरखास्त करण्याचा कट रचला होता, असा खळबळजनक खुलासाही हंसराज भारद्वाज यांनी केल्यामुळे उत्तरप्रदेशातील राजकारण चांगलेच तापले आहे.
आधी अरुणचल प्रदेश आणि नंतर उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याच्या मुद्यावरून केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपावर टीका करणार्‍या कॉंग्रेसला यामुळे घरचा अहेर मिळाला आहे. हंसराज भारद्वाज कॉंग्रेसप्रणीत संपुआ-१ च्या कार्यकाळात विधिमंत्री होते, हे विशेष.
अनेक मुद्यांवर कॉंग्रेसच्या विचारधारेचा आपल्याला वीट आला होता आणि आपण त्यांची पाठराखण करू शकत नव्हतो. विशेष करून उत्तरप्रदेश आणि २-जी स्पेक्ट्रमच्या मुद्यावर पक्षाच्या भूमिकेचे मी कधीच समर्थन केले नाही, असेही ते म्हणाले. संपुआ-२ च्या कार्यकाळात भारद्वाज यांना मंत्री न करता कर्नाटकचे राज्यपाल करण्यात आले होते.
कॉंग्रेसने आपल्याला वाळीत टाकल्याबद्दल भारद्वाज यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कर्नाटकात कॉंग्रेस सत्तेत परत आल्यानंतर राजकीयदृष्ट्या मला दूर सारण्यात आले. आता मी स्वत:ला कॉंग्रेसी मानतच नाही, असेही त्यांनी सांगितले.
कॉंग्रेसने अनेकदा घटनेतील ३५६ व्या कलमाचा दुरुपयोग केला, असा आरोपही त्यांनी केला. बिहारमध्ये २३ मे २००५ रोजी मध्यरात्री राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले असता विधानसभा भंग करण्याचा निर्णय घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला, याची आठवणही भारद्वाज यांनी करून दिली.
सोनिया, राहुलने स्पष्टीकरण द्यावे
२००७ मध्ये उत्तरप्रदेशातील मुलायमसिंह यांचे सरकार बडतर्फ करण्याचा कट कॉंग्रेस नेतृत्वाने रचला होता, या माजी केंद्रीय विधिमंत्री व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते हंसराज भारद्वाज यांनी केलेल्या खुलाशावर कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी भाजपाने केली आहे. भारद्वाज यांनी केलेल्या खुलाशात नवीन काहीच नाही. ३५६ व्या कलमाचा दुरुपयोग करण्याचा कॉँग्रेसचा इतिहासच आहे. त्यामुळे आम्हाला अनेक संदेश देणार्‍या कॉंग्रेस नेतृत्वाने या मुद्यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27812

Posted by on Apr 16 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (496 of 2453 articles)


नवी दिल्ली, [९ एप्रिल] - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी सागरमला प्रकल्पातून येत्या चार-पाच वर्षांत देशात एक कोटीहून जास्त रोजगाराच्या संधी निर्माण ...

×