Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » राहुल परतण्याची कल्पना सहन होत नाही!

राहुल परतण्याची कल्पना सहन होत नाही!

=कॉंग्रेसमधील अनेक नेत्यांच्या मनातील वास्तव=
sheila-dixitनवी दिल्ली, [१५ एप्रिल] – कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या क्षमतेवर पक्षातील बहुतेक सर्वच वरिष्ठ नेत्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्यानंतर, दीर्घ सुटीवर असलेले राहुल गांधी यांच्या परत येण्याच्या कल्पनेनेच अनेक नेते धास्तावले आहेत. ते आता पक्षात कधीच परतू नये, असे मत अनेक नेते खाजगीत व्यक्त करीत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.
मंगळवारी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी राहुल गांधी यांच्यात पक्षाचे नेतृत्व करण्याची योग्यताच नसल्याचे मत व्यक्त केले होते. यापूर्वीही अनेक नेत्यांनी त्यांच्या योग्यतेवर गंभीर प्रश्‍नचिन्ह लावले आहे. गेल्या ५६ दिवसांपासून सुटीवर असलेले राहुल गांधी कोणत्याही क्षणी भारतात परत येण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच, याच पक्षातील नेत्यांना ही कल्पनाही मान्य नसल्याचे दिसून येत आहे.
पक्षातील उच्चस्तरीय सूत्राच्या मते, संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू होण्याआधी जेव्हा राहुल गांधी सुटीवर गेले, त्यावेळी पक्षातील नेत्यांना आपली कमी जाणवेल, आपल्याशिवाय पक्षाचा गाडा चालूच शकणार नाही, असे नेत्यांना वाटेल, असंख्य कार्यकर्ते आणि नेत्यांचे मन दुखावले जाईल आणि ते आपल्याला परत येण्यासाठी आग्रह करतील, अशी त्यांची धारणा होती. पण, तसे काहीच झाले नाही. उलट, राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीमुळे बहुतांश नेते सुखावले आहेत. यातील काही नेत्यांनी तर पर्याय शोधण्यासही सुरुवात केली आहे.
शीला दीक्षित यांनी आपल्या मंगळवारच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, सोनिया गांधींच्या नेतृत्वावर विश्‍वास व्यक्त करतानाच राहुल गांधींवर टीका करणार्‍या माझ्या वक्तव्यावर अद्याप पक्षातील कोणत्याही नेत्याने प्रतिकूल प्रतिक्रिया दिलेली नाही. राहुल गांधींचे नेतृत्व अपयशी ठरले आहे, ही सत्यता पक्षात कोणीही नाकारू शकत नाही. पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून आतापर्यंत ते अपयशी नेतेच सिद्ध झाले आहेत. सोनिया गांधी यांनीच पक्षाची सूत्रे हाताळावी आणि राहुल गांधी असेच कायमस्वरूपी सुटीवर रहावे, अशीच पक्षातील बहुतांश नेत्यांची भावना आहे.
कॉंग्रेसशी आजवर एकनिष्ठ राहिलेल्यांना सोनिया गांधीच अध्यक्षपदी हव्या आहेत. तर, सोनियांना आपले पुत्र राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्व सोपवावे, असे वाटते. पण, राहुल गांधींच्या मनात नेमके काय आहे, हे कुणालाच माहीत नाही. भूतकाळातून बाहेर येऊन पक्षाला चांगले भविष्य मिळावे, ही सामान्य भावना आहे. पण, कॉंग्रेसचा विचार केल्यास भविष्यात काय लिहिले आहे, हे सांगणे कठीण आहे. सोनिया गांधी आजारपणामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना आपल्याच घराण्यातील उत्तराधिकारी हवा आहे. मात्र, कॉंग्रेसमधील निष्ठावंतांना नवा नेता हवा आहे. अशा स्थितीत पक्षात बंडखोरीची शक्यता नाकारता येणार नाही, असेही सूत्राला वाटते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22091

Posted by on Apr 15 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1789 of 2453 articles)


=गोपनीय फाईल्स सार्वजनिक करण्याची मागणी= बर्लिन, [१४ एप्रिल] - आझाद हिंद सेनेचे संस्थापक आणि थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे ...

×