Home » ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » रा स्व संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी कायम

रा स्व संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी कायम

bhaiyyaji joshiनागपूर, [१४ मार्च] – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान सरकार्यवाह सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांची याच पदावर पुढील तीन वर्षांसाठी फेरनिवड झालेली आहे. भय्याजी जोशी यांची तिसर्‍यांदा सरकार्यवाहपदी निवड झाली आहे. यासंबंधीची घोषणा रा. स्व. संघाचे अ. भा. सहप्रचारप्रमुख नंदकुमार यांनी आज एका पत्रपरिषदेत केली.
संघाच्या घटनेप्रमाणे सरकार्यवाहांची निवडणूक होते. अखिल भारतीय प्रतिनिधी सभेस आलेल्या प्रतिनिधींमधून ही निवड होत असते. उत्तर क्षेत्राचे संघचालक डॉ. बजरंगलाल गुप्ता हे निवडणूक अधिकारी होते. बिहार प्रांताचे संघचालक सिद्धीनाथ सिंग यांनी सरकार्यवाहपदासाठी भय्याजी जोशी यांच्या नावाचा प्रस्ताव सभेपुढे मांडला. राजस्थानचे संघचालक डॉ. भगवती प्रसाद, दक्षिणमध्य क्षेत्राचे कार्यवाह रामकृष्ण राव व पश्‍चिम क्षेत्राचे कार्यवाह सुनील मेहता या तिघांनी सिद्धीनाथ सिंग यांनी मांडलेल्या प्रस्तावास अनुमोदन दिले. भय्याजी जोशी यांच्या नावाव्यतिरिक्त अन्य कोणतेही नाव या पदासाठी प्रस्तावित न झाल्याने निवडणूक अधिकार्‍यांनी भय्याजी जोशी यांची सरकार्यवाह पदावर निवड झाल्याचे घोषित केले.
‘भय्याजी जोशी यांचे संघटनकौशल्य, योजनापूर्वक कार्य यावर पुन्हा एकदा प्रतिनिधी सभेने विश्‍वास व्यक्त केला’, असे नंदकुमार म्हणाले.
आज प्रतिनिधी सभेत पारित झालेल्या प्रस्तावांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवसासंबंधीचा प्रस्ताव पारित करण्यात आला. संयुक्त राष्ट्रसभेच्या ६९ व्या महासभेत, दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची जी घोषणा झाली, त्यामुळे सर्व भारतीय तसेच भारतीय वंशाचे लोक व योगप्रेमी यांना आनंद झाला असून, हा योगविद्येचा गौरव आहे, अशी भावना या प्रस्तावात व्यक्त करण्यात आली आहे. यासंबंधी माहिती देताना नंदकुमार म्हणाले की, भारताच्या पंतप्रधानांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आंतरराष्ट्रीय योगदिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याला अभूतपूर्व समर्थन प्राप्त झाले. संयुक्त राष्ट्र महासभेत १७५ देश सभासद आहेत. या सर्वांनी या प्रस्तावास समर्थन दिले व हा प्रस्ताव सर्वानुमते बिनविरोध व मतदान न घेता पारित झाला.
या प्रस्तावासाठी ज्यांनी योगदान दिले, त्या भारतीय प्रतिनिधींचे, सहप्रस्तावकांचे तसेच प्रस्तावाच्या समर्थनार्थ ज्यांनी योगदान दिले त्यांचे अ. भा. प्रतिनिधीसभेने अभिनंदन केले आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारांना योग या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची प्रतिनिधी सभेने सूचना केली आहे. तसेच, समाजात योगविषयक कार्य करणार्‍या संस्थांनाही प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार्‍या, परिवारातील संस्थांची प्रतिवेदने अ. भा. प्रतिनिधी सभेत येण्यास सुरुवात झाली असून, शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांची प्रतिवेदने आलेली आहेत. अन्य संस्थांची प्रतिवेदने यानंतर येतील असेही नंदकुमार यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.
केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज प्रतिनिधी सभेस भेट दिली, अशी माहिती नंदकुमार यांनी दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21443

Posted by on Mar 15 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (1911 of 2455 articles)


=लंडन येथे कांस्य पुतळ्याचे थाटात अनावरण= लंडन, [१४ मार्च] - महात्मा गांधी यांच्या ऐतिहासिक कांस्य पुतळ्याचे आज शनिवारी येथील पार्लियामेंट ...

×