Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » रिअल इस्टेट विधेयक याच अधिवेशनात

रिअल इस्टेट विधेयक याच अधिवेशनात

sansad top three lionsनवी दिल्ली, [८ मार्च] – बोगस रिअल इस्टेट डेव्हलपर्स आणि मध्यस्थांपासून घर खरेदी करणार्‍यांना आवश्यक ते संरक्षण प्रदान करण्याची तरतूद असलेले रिअल इस्टेट विधेयक संसदेच्या याच अधिवेशनात लोकसभेत सादर केले जाऊ शकते.
लोकसभा अधिवेशनाचा दुसरा टप्पा येत्या २० तारखेपासून, तर राज्यसभा अधिवेशनाचा दुसरा टप्पा २३ पासून सुरू होत आहे. हे संपत्तीविषयक विधेयक आहे. सर्वसामान्य जनतेच्या हिताचे रक्षण करण्याची तरतूद त्यात असून, याच अधिवेशनात ते सादर करण्याचा आमचा मानस आहे, असे संसदीय व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, मंगळवारी सायंकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकातील दुरुस्त्यांना मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे ते लोकसभेत सादर करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
सध्याच्या विधेयकातही बोगस इस्टेट डेव्हलपर्स आणि मध्यस्थांना कारागृहाच्या शिक्षेसह अन्य दंडात्मक शिक्षेची तरतूद आहे. पण, गृहनिर्माण प्रकल्पात काम करणार्‍यांसह सर्वच डेव्हलपर्सला या नव्या कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी आम्ही त्यात काही आवश्यक दुरुस्त्या केल्या आहेत, असे मंत्रालयातील सूत्राने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21935

Posted by on Apr 9 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1811 of 2453 articles)


=सुनील लाल यांची मागणी= नवी दिल्ली, [८ एप्रिल] - आम आदमी पार्टीतील अंतर्गत कलह आता चांगलाच शिगेला पोहोचला आहे. एका ...

×