Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » रिझर्व्ह बँकेकडून रेपोदरात कपात

रिझर्व्ह बँकेकडून रेपोदरात कपात

RBI-BULDINGमुंबई, [५ एप्रिल] – रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षांतील पहिले पतधोरण आज जाहीर केले आहे. रिझर्व्ह बँकेने आज मंगळवारी जाहीर केलेल्या द्विमाही पतधारेणाच्या आढाव्यात रेपो दरात ०.२५ टक्क्यांनी कपात केली आहे. रेपो रेट ६.७५ टक्क्यांवरून ६.५० टक्के करण्यात आला आहे. या कपातीनंतर गृहकर्जाचे व्याज दर कमी होण्याची शक्यता आहे.
आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज पतधोरण जाहीर केले. सीआरआर दरात कोणतेही बदल करण्यात आलेला नाही. तो ४ टक्क्यांवर कायम आहे. रेपो दरात कपात करण्यात आली असली तरी रिव्हर्स रेपो दरात बँकेने पाव टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरकपातीमुळे गृह कर्जासह इतर कर्जे स्वस्त होण्याची शक्यता आहे.
चालू आर्थिक वर्षात विकासदर ७.६ टक्के इतका राहिल, या अंदाजावरही शिक्कामोर्तब केले आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज स्पष्ट केले की, बँकांच्या व्याजदरात आतापर्यंत अर्धा टक्का कपात करण्यात आली आहे. येणार्‍या काळात आणखी कपात होईल.
दरम्यान, कर्जाप्रमाणेच ठेवीवरील व्याजदरदेखील कमी झाल्याने मात्र जे नागरिक व्याजावर अवलंबून आहेत त्यांना झळ सोसावी लागणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27715

Posted by on Apr 5 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (525 of 2453 articles)


नवी दिल्ली, [५ एप्रिल] - देशातील पहिली सेमी हाय - स्पीड एक्सप्रेस म्हणजे गतिमान एक्स्प्रेसला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज ...

×