Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » रिझर्व बँकेचा गव्हर्नर म्हणून चांगले काम करेन

रिझर्व बँकेचा गव्हर्नर म्हणून चांगले काम करेन

=चेतन भगत यांचा ‘आप’वर पलटवार=
chetan-bhagatनवी दिल्ली, [२० जून] – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदाची जबाबदारी मी उत्कृष्टपणे पार पाडेन. तुमच्या कुणाहीपेक्षा माझे अर्थविषयक ज्ञान चांगले आहे, अशा शब्दात चेतन भगत यांनी रविवारी आम आदमी पार्टीवर पलटवार केला.
केंद्र सरकारने प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांना आरबीआयचे गव्हर्नर करावे, अशी बोचरी टीका आम आदमी पार्टीने केली होती, हे विशेष.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांच्या नियुक्तीला आपने आक्षेप घेतला. चौहान यांना फॅशनमधील काय कळते, असा सवाल करत यापुढे आता केंद्र सरकारने चेतन भगत यांची आरबीआय गव्हर्नरपदी, अनुपम खेर यांना इस्त्रोचे प्रमुख आणि एकनाथ खडसे यांना राष्ट्रीय तपास संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्त करावे, अशी बोचरी टीका आपचे प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी येथे केली होती.
आपने केलेल्या टीकेला भगत यांनी ट्विटरवरून उत्तर दिले. त्यांनी म्हटले आहे की, आम आदमी पार्टी माझी खिल्ली उडवत आहे; पण मला सरकारने आरबीआयचे गव्हर्नर केले तर आजवर झालेल्या गव्हर्नरेपक्षाही माझी कामगिरी सर्वोत्तम राहील. त्यामुळे आम आदमी पक्षाने मला गव्हर्नर करायचे ठरवले तर माझे अर्थविषयक ज्ञान पक्के असल्याने चांगली कामगिरी करेन, असा टोलाही भगत यांनी लगावला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28663

Posted by on Jun 21 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (211 of 2452 articles)


नवी दिल्ली, [२० जून] - योग करताना ‘ॐ’ असा उच्चार केल्याने कोणाचाही धर्म बदलणार नाही. ओम धर्मनिरपेक्ष आणि वैश्‍विक स्तरावर ...

×