Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » रियल इस्टेट विधेयक राज्यसभेत पारित

रियल इस्टेट विधेयक राज्यसभेत पारित

=घर खरेदी करणार्‍यांना दिलासा=
नवी दिल्ली, [१० मार्च] – मोदी सरकारसाठी अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणारे रियल इस्टेट (नियमन आणि विकास) विधेयक आज गुरुवारी राज्यसभेत पारित करण्यात आले. हे विधेयक पारित झाल्यामुळे घरांची खरेदी करणार्‍यांना मोठा दिलासा मिळणार असून, या क्षेत्रात होणार्‍या काळ्या पैशाच्या व्यवहारांवरही नियंत्रण येणार आहे.
गृहनिर्माणाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होणार्‍या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी, तसेच या क्षेत्राबाबत लोकांच्या मनात विश्‍वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी हे विधेयक आणण्यात आले होते. या क्षेत्रात होणार्‍या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी, तसेच बांधकाम क्षेत्रातील उद्योजकांची जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी या विधेयकाचा उपयोग होणार आहे.
ग्राहकांची फसवणूक करणार्‍या बांधकाम उद्योजकांना तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद या विधेयकात आहे. त्याचप्रमाणे एखाद्या प्रकल्पासाठी निर्धारित करण्यात आलेल्या खर्चाच्या ७० टक्के रक्कम राखीव म्हणून ठेवण्याची, जेणेकरून त्याचा उपयोग दुसर्‍या व्यवहारात करता येणार नाही, अशी तरतूदही या विधेयकात आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27224

Posted by on Mar 12 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (697 of 2453 articles)


इशरत प्रकरण राजनाथसिंह यांची रोखठोक भूमिका दहशतवादाच्या मुद्यावर तडजोड नाही सखोल चौकशीनंतरच कारवाई नवी दिल्ली, [१० मार्च] - इशरत ...

×