Home » ठळक बातम्या, वाणिज्य » रिलायन्सच्या थ्रीजी सेवेचा विस्तार

रिलायन्सच्या थ्रीजी सेवेचा विस्तार

नवी दिल्ली, [११ जून] – देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशनतर्फे देशातील अन्य पाच विभागात थ्रीजी सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. याबाबत बोलताना आरकॉमच्या ग्राहक व्यापार विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरदीप सिंह यांनी सांगितले की, सध्या कंपनीतर्फे देशातील १३ विभागात थ्रीजी सेवा दिली जात आहे. अन्य पाच विभागांत थ्रीजी सेवा सुरु केल्यानंतर देशातील सर्व प्रमुख शहरांत कंपनीची ही सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे डाटा मार्केटमध्ये कंपनी अधिक जोमाने वाटचाल करू शकेल. देशात स्मार्टफोन्सच्या वापरात ८० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे आपोआपच इंटरनेट वापरणार्‍यांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. थ्रीजी सेवेच्या विस्तारामुळे या ग्राहकांना कंपनीकडे आकर्षित करण्याचे आमचे लक्ष्य पूर्ण होऊ शकेल, अशी आम्हाला आशा आहे, असेही त्यांनी सांगितले.
कंपनीतर्फे सध्या दिल्ली, मुंबई, कोलकाता, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, पश्‍चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, बिहार, ओडिशा, आसाम, उत्तर पूर्व आणि जम्मू-काश्मीर या विभागांत थ्रीजी सेवा पुरविण्यात येत असून पुढील टप्प्यात आता तामिळनाडू, आंधप्रदेश, कर्नाटक, केरळ आणि पूर्व उत्तरप्रदेश या पाच विभागांंमध्ये थ्रीजी सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=13513

Posted by on Jun 12 2014. Filed under ठळक बातम्या, वाणिज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, वाणिज्य (2417 of 2455 articles)


हवामान खात्याने दिली माहिती कोरड्या दुष्काळाची भीती केरळ व्यापला, गोव्याला उशिर नवी दिल्ली, [९ जून] - मान्सूनने अवघ्या दोन ...

×