Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » रेल्वेची दररोज सात किमीची मार्गनिर्मिती

रेल्वेची दररोज सात किमीची मार्गनिर्मिती

railway projectनवी दिल्ली, [२८ फेब्रुवारी] – भारतीय रेल्वे २०१६-१७ मध्ये दररोज सात किलोमीटर मार्गाचे निर्माण कार्य हाती घेणार आहे. गेल्या सहा वर्षात याची सरासरी ४.३ किलोमीटर इतकी होती.
२०१७-१८ मध्ये या कामाची गती अधिक वाढविण्याचा प्रयत्न असून, १३ कि.मी.चे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. २०१८-१९ साली यापेक्षाही जास्त वेगाने कार्य हाती घेण्याचा विचार आहे. यासाठी योजना आखली जात असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. नवीन मार्गाचे निर्माण, दुहेरी व तिहेरी मार्ग तयार करणे या गोष्टी वाहतुकीतील अडथळे बाजूला सारण्यासाठी आवश्यक आहेत. चालू आर्थिक वर्षात २५०० कि.मी., तर पुढील वर्षात २८०० कि.मी. ब्रॉड गेज मार्गाच्या निर्माणाचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्‍चित करण्यात आले आहे. मालवाहतूक सुरळीत करण्यासाठी तीन कॉरिडॉरही बांधण्यात येणार आहेत.
यातील पश्‍चिम व पूर्व कॉरिडॉरचे काम सुरू आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26953

Posted by on Feb 29 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (795 of 2453 articles)


=इशरत जहॉं चकमक प्रकरण= नवी दिल्ली, [२८ फेब्रुवारी] - इशरत जहॉं चकमक प्रकरणात २००९ साली तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री व गांधी ...

×