Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » रेल्वे अर्थसंकल्पाची प्रथा बंद होणार

रेल्वे अर्थसंकल्पाची प्रथा बंद होणार

railway1नवी दिल्ली, [१३ ऑगस्ट] – गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक वर्षी फेबु्रवारी महिन्यात संसदेत सादर होणार्‍या रेल्वे अर्थसंकल्पाचे हे कदाचित शेवटचे वर्ष ठरू शकते. कारण, पुढील वर्षीपासून रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा बंद होण्याची शक्यता आहे. देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातच रेल्वेसाठी तरतूद करण्याचा प्रस्ताव आहे.
संसदेत रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा गेल्या ९२ वर्षांपासून चालत आली आहे. ही प्रथा बंद करण्याची आणि केंद्रीय अर्थसंकल्पातच तो समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली असून, याबाबतच्या प्रस्तावाला केंद्रीय अर्थमंत्रालयाने मान्यता दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा बंद करता येऊ शकते का, यावर मत जाणून घेण्यासाठी अर्थ मंत्रालयाने पाच तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. ब्रिटिश काळापासून चालत आलेली रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा मोडित काढावी, अशी शिफारस समितीने केंद्र सरकारला केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29207

Posted by on Aug 14 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (120 of 2453 articles)


=भाजपाध्यक्षांची तोफ= काकोरी, [१३ ऑगस्ट] - तब्बल ६० वर्षे केवळ एकाच घराण्याने देशावर राज्य केले असल्याने स्वातंत्र्यापासून देशाचा पाहिजे तसा ...

×